Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गर्दीचा फायदा घेत एसटी बस मध्ये चोरी करणाऱ्या महिलेस मुद्देमालासह अटक.

 गर्दीचा फायदा घेत एसटी बस मध्ये चोरी करणाऱ्या महिलेस मुद्देमालासह अटक.

-------------------------------- 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------- 

सौ. सुशिला विष्णु चौगुले, रा. उंबरवाडी, महागाव, ता. गाडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर ह्या दिनांक 27/04/2024 रोजी सायंकाळी 17.15 वा ते 17-20 वा. चे दरम्यान मुदतीत मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूर येथे गडहिंग्लज जाणारे एस. टी. बस मध्ये चढत असताना अज्ञात महिलेने  गर्दीत फिर्यादी यांचे खांद्यांस अडकविलेली पर्सची चेन काढून त्यामधुन 140 ग्रॅमचे सोन्याचे दागीने चोरलेबाबत शाहुपूरी पोलीस ठाणे, गु.र.नं.416/2024, भा.द.वि.स.क.379 प्रमाणे दिनांक 27/04/2024 रोजी गुन्हा दाखल आहे.



पोलीस अधीक्षक  यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, संदिप जाधव तसेच पोलीस अमंलदार सुरेश पाटील व सागर माने यांचे तपास पथक तयार करुन नमुद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. नमुद तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीकदृष्टया व गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेवून तपास करीत असताना सदरचा गुन्हा इचलकरंजी येथील एका महीला आरोपीने केला असलेची खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने नमुद पथकाने दि. 14.08.2024 रोजी सदर महीलेचे उपलब्ध पत्यावर तीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेवून सखोल तपास केला असता तीने सदर गुन्हयाची कबुली दिली असून तीचेकडुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले 140 ग्रॅम वजनाचे, 7,25,160 /- रु किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त केले आहेत. नमुद महीलेस जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाई करीता शाहुपूरी पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास शाहुपूरी पोलीस ठाणे करवी सुरू आहे.


सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, शेष मोरे तसेच पोलीस अमंलदार राम कोळी, सुरेश पाटील, सागर माने, संजय कुंभार, सुशिल पाटील, परशुराम गुजरे तसेच शहापूर पोलीस ठाणे कडील आसिफ कलायगार तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक शाखा, कोल्हापूर कडील महीला सहायक फौजदार सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील व धनश्री पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments