महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी असताना देखील सांगलीत गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढली.
--------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------
सांगली: राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखू सारख्या आरोग्यास हानिकारक पदार्थांच्या विक्रीस व ते बाळगण्यास बंदी असतानाही सांगली शहरासह जिल्ह्यात गुटख्याची छुपा पद्धतीने तस्करी होत असल्याचे पोलिसांच्या कारवायांवरून स्पष्ट झाले आहे. यंदा सांगली पोलिसांनी गुटखा तस्करी करणाऱ्या 32 जणांना अटक करून तब्बल पावणेतीन कोटी रुपये किमतीच्या वेगवेगळ्या प्रकाराच्या गुटख्याचा साठा जप्त केला. तरीही चौकात चौकातील पान टपऱ्यांवर गुटक्याचे खुलेआम विक्री होतच आहे. गुटक्याची खरेदी- विक्री रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनासमोर आहे.
तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात गुटखा, मावा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर निर्बंध घातले आहे. मात्र सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या पदार्थांची सर्रास खरेदी-विक्री होत आहे. राज्यात गुटखा उत्पादनाला बंदी असल्याने शेजारील राज्यातून गुटक्याचे तस्करी जोमाने सुरू आहे.
परराज्यातून खुष्कीच्या मार्गाने गुटखा, सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून दिसून येते.
तस्करी करून जिल्ह्यात आलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखूचा विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यावधीच्या घरात असल्याचे बोलले जाते.
राज्यात गुटखा उत्पादनावर बंदी आहे. त्यामुळे अनेक गुटखा उत्पादकानी जिल्ह्याच्या सीमेलगतच कर्नाटक हद्दीत गुटखा उत्पादनाचे कारखाने उभारले आहेत. तेथूनच गुटख्याचे मोठे तस्करी होते. जिल्ह्यासह शहरात गुटख्याचे वाहतूक करण्यासाठी गुन्हेगारांची मोठी साखळी कार्यरत आहे. त्यातून गुटखा जिल्ह्यात ही साखळी मोडून काढण्याची गरज आहे. कर्नाटकासह आंध्र प्रदेशातुम्ही गुटक्याची तस्करी केली जात असल्याचे समजते.
सांगली जिल्ह्यात छुप्या मार्गाने गुटखा आणला जातो त्याशिवाय पुणे, अहमदनगर जिल्ह्यात ही सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून गुटख्याचे वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. विशेषत: विजापूर परिसरातून गुटख्याची होती वाहनातून जत मार्गे पुणे, नगर कडे नेण्यात येत असल्याचे सिद्ध झाले आहे.
कंटेनर, टेम्पो, ट्रक अशा मोठ्या वाहनातून कर्नाटकातून गुटखा वाहतूक केले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. याशिवाय काही तस्करांकडून आलिशान गाड्यांच्या आहे वापर गुटखा वाहतुकीसाठी केला जातो. जत तालुक्यात नुकताच पकडलेला गुटखा ट्रक मधून नेण्यात येत होता. मोठ्या वाहनांची तपासणी फारशी होत नसल्याचाच गैरफायदा तस्करी करणारे घेत आहेत....
0 Comments