दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला स्वातंत्र्य दिन.
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला स्वातंत्र्य दिन.
--------------------------
बिद्री प्रतिनिधी
विजय कांबळे
--------------------------
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली ता करवीर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक मा.श्री. बाळासाहेब राऊत सर उपस्थित होते. शाळेच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.संस्थेचे अध्यक्ष राऊत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यवीराच्या कार्यावर प्रकाश टाकत स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले.यामध्ये बालचमूचा अधिक सहभाग होता. इयत्ता आठवीची विद्यार्थीनी आर्या पाटील हीचे भाषण लक्षवेधी ठरले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शोभना पठाणे मॅडम व स्वाती डोंगळे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीरा राऊत मॅडम,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment