शेतकरी सभासदांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
वारणानगर (ता.पन्हाळा) येथे श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना व ईलाइट कृषी सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
जगात मानवाला रोगमुक्त जगण्यासाठी सेंद्रिय शेतीला पर्याय नाही म्हणून सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे.आधुनिक ऊस शेतीकडे शेतकऱ्यांनी वळायला पाहीजे हवामानातील बदलामुळे शेती क्षेत्रावर परिणाम होत आहे.भविष्यात ऊसाचे उत्पादन कसे वाढेल त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत.शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवून सेंद्रिय शेती आणि खताचा वापर करावा असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे(सावकर) यांनी केले...*
*यावेळी वारणा दूध संघांचे संचालक शिवाजी जंगम,वारणा कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील,ऊस विकास अधिकारी सुभाष करडे,कृषी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,अनिकेत केकरे आदी पदाधिकारी,अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments