कुपवाड च्या मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे संतप्त, नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, महापालिका प्रशासनाविरोधात रस्ता रोको आंदोलन.

कुपवाड च्या मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे संतप्त, नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, महापालिका प्रशासनाविरोधात रस्ता रोको आंदोलन.

-----------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

-----------------------------------

कुपवाड: शहराच्या मुख्य रस्त्याचे काम रखडल्यामुळे वाहन चालकासह या परिसरातील व्यावसायिक नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज मंगळवारी महापालिका प्रशासनाविरोधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मुख्य रस्त्याचे काम रखल्ल्यामुळे तसेच रस्त्या बाजूचे विद्युत खांब करण्यासाठी कुपवाड शहर संघर्ष समितीच्या नेतृत्वात सामाजिक संघटना तसेच कुपवाड नागरिकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे. 

गेल्या दोन अडीच महिन्यापासून मुख्य रस्त्याचे काम रखडलेले आहे. जुने विद्युत पोल रस्त्यावरच असल्याने या रस्त्याच्या कामात अडथळा होत असल्याने व त्यामुळे मनपा आयुक्तांनी स्वतः सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र नागरिकांनी सुरू असलेल्या ठेकेदारांकडून ढिसाळ कामाचा पाडाच एकदम समोर वाचून दाखवला आहे. 

यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी नागरिकांच्या बाजूने एकूण घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व पुढील कामात सुधारणा करून पुढे काम गतीने सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन स्थानिकांच्या तोंडाला पाणी पुसण्यासारखेच राहून गेले. दोन अडीच महिन्यापासून कुपवाडला कोणी वाली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली . कुपवाड शहर संघर्ष समिती व व्यापारी संघटना यांच्या मागणीनाही मनपा अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविले गेले होती. अर्धवट राहिलेल्या कामाचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच नजीकच दोन ते तीन शाळा असल्याने लहान विद्यार्थी मुला-मुलींनाही याचा त्रास सहन करावा लागला, सोबतच स्थानिकांनाही या रस्त्यावरचे होणारे वर्दळ त्रासदायक ठरू लागलेली आहे. 

या महापालिकेच्या अर्धवट रस्त्याच्या कामाचा त्रास बघत आज कुपवाड करांच्या व नागरिकांच्या रोष प्रशासनाला पाहायला मिळाला. संपूर्ण कुपवाड शहर वाशी यांच्या वतीने रस्ता रोको पुकारण्यात आला. या रस्ता रोको आंदोलनात कुपवाड मधून 150 ते 200 दोनशे कार्यकर्ते व नागरिक सहभाग घेऊन आपला रोज व्यक्त केला. यावेळी प्रशासनाच्या कारभार विरोधात जोरदार घोषणा पाहायला मिळाले.

एक ते दीड तास सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे आंदोलन लवकर थांबवण्यासाठी प्रशासनासमोर शक्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र नागरिक कोणतीही बाजू एकाला तयार नव्हते. ज्यांनी वेळेवर कामाचे आश्वासन दिले त्याच अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारण्यासाठी नागरिक तटस्थ भूमिकेत राहून आपली आक्रमक भूमिका बजावताना दिसले. 

यावेळी प्रशासनाकडून उद्यापासून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले व त्वरित रस्त्याच्या कामास अडथळे ठरणारे विद्युत पूल करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन कर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यादरम्यान

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.