विद्यामंदिर करंजफेण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शहाजी ढेरे यांची फेर निवड.
-----------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-----------------------------------
विद्यामंदिर करंजफेण ता राधानगरी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शहाजी एकनाथ ढेरे यांची फेर निवड करण्यात आली.
चालु शैक्षणिक वर्षाची पालक सभा आयोजित करण्यात आली होती या सभेतुन नवीन शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली यात मागील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदाची जबाबदारी शहाजी एकनाथ ढेरे यांनी उत्तम प्रकारे पार पाडल्या बद्दल त्यांची अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी प्रशांती कांबळे, सचिव पदी मुख्याध्यापिका विश्वांती मुंडे तसेच नविन सदस्य म्हणून संजय पाटील, महेश जमदाडे,गीता कांबळे, मनिषा वागरे, शितल वागरे.प्रमिला वागरे यांची निवड करण्यात आली.यावेळी नुतन अध्यक्ष शहाजी ढेरे यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करूया असे सांगितले, यावेळी नवीन झालेल्या शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.बालाजी राख यांनी सुत्रसंचलन केले, प्रास्ताविक मुख्याध्यापिका विश्रांती मुंडे यांनी केले, आभार माधुरी बिरबोळे यांनी मानले
0 Comments