कुंभोज परिसरात दीप अमावस्याने श्रावण महिन्याचे स्वागत.

 कुंभोज परिसरात दीप अमावस्याने श्रावण महिन्याचे स्वागत.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

        उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून आज हिंदू धर्मातील दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर अमावस्या दिवशी रिद्धी सिद्धी देवीचे आगमन घरात होऊन घरात अनेक ठिकाणी दिवे लावून प्रकाशमय वातावरण तयार होते. व त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. अशी आख्यायिका सांगितली जाते.

       या आख्यायिकेप्रमाणे हिंदू धर्म रितीरिवाजाप्रमाणे अनेक ठिकाणी प्रकाश देणाऱ्या समीचे पूजन करून त्या समईला अनेक प्रकारच्या वृक्षांची पाण्याने सजवण्यात येते. सायंकाळी देवीची आरती करून गोड नैवेद्य दाखवण्यात आला. खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याची सुरुवात आजच्या दिप अमावस्यांनी होत असल्याची आख्यायिका हिंदू धर्म रिती रिवाजाप्रमाणे सर्वत्र सांगितली जाते. आजच्या दिवशी रिद्धी सिद्धीची अत्यंत धार्मिक पूजा करून श्रावण महिन्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते .

      त्याचप्रमाणे हिंदू धर्म परंपरेप्रमाणे उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यासाठी सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.