Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भादोले येथील सोलर पॅनल घोटाळा चौकशीसाठी युवकाचा जिल्हा परिषद समोर आत्मदहणाचा प्रयत्न.

 भादोले येथील सोलर पॅनल घोटाळा चौकशीसाठी युवकाचा जिल्हा परिषद समोर आत्मदहणाचा प्रयत्न.

------------------------------ 

हातकणंगले प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कोल्हापूर जिल्हा परिषद आवारात एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. कृष्णात भीमराव पाटील असं त्या तरुणाचं नाव आहे. भादोले (ता. हातकणंगले) गावातील सोलार पॅनलची चौकशी करा या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.


कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम सुरु असताना कृष्णात पाटील यांनी अचानकपणे जि.प. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच अंगावर पेट्रोल ओतून घेतले. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. भादोले गावातील सोलार पॅनलची चौकशी करा, भादोले गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी भष्ट्राचार केला असून त्यांची चौकशी करा अशी मागणी केली होती. तसेच कारवाई न केल्यास 15 ऑगस्ट ला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याची दखल न घेतल्याने कृष्णात पाटील यांनी प्लॅस्टिक कॅन मधून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करून पाटील यांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

Post a Comment

0 Comments