Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांची वाईतून रॅली.

 ‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांची वाईतून रॅली.

--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

‘हर घर तिरंगा’ जागृतीनिमित्त कार्यक्रम

वाई: दि. १४ ऑगस्ट 

 येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी वाईतून ‘हर घर तिरंगा’ निमित्त रॅली काढून जनजागृती केली. महाविद्यालयापासून सिद्धनाथवाडी मार्गे वाई शहरातून बसस्थानकापर्यंत ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’, ‘तिरंगा आपली शान, याचे ठेवा भान’, ‘भारत माता की जय’, ‘मेरा भारत महान’, ‘राखूया राखूया, राष्ट्रध्वजाचा मान राखूया’, ‘वंदे मातरम्’, ‘झेंडा उंच, रहे हमारा’, ’सारे जहाँ से अच्छां हिंदोस्ताँ हमारा’ अशा घोषणा देऊन, वाईकर नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत केले. या राष्ट्रीय व समाजोपयोगी रॅलीतून समाधान मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. 

 रॅलीच्या सुरुवातीस महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी शुभेच्छा देताना, तिरंगा रॅली काढताना आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, एन. एस. एस.च्या स्वयंसेवकांनी आपापल्या गावातील ग्रामस्थांनी घरावर तिरंगा फडकवावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी रॅलीचे नेटके नियोजन केले. याप्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य व एन.एस. एस. चे सल्लागार प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. राजेश गावित, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण मागाडे यांची उपस्थिती होती. रॅलीच्या यशस्वीतेसाठी नेहा पिसाळ, प्रिशा साळुंखे, सिद्धी गायकवाड, संध्या मांढरे, आदित्य लहाने, मसिरा काझी, गायत्री ढवळे यांनी परिश्रम घेतले. या रॅलीमध्ये एन.एस. एस.च्या स्वयंसेवकानी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments