१४ ऑगस्ट रोजी तिरंगा देशभक्ती दौडचे आयोजन.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
----------------------------------
नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन.
: हर घर तिरंगा ही आपल्या देशामध्ये लोक चळवळ बनलेली आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांच्या राष्ट्रभक्तीचा, त्यांच्या बलिदानाचा सन्मान आणि भारताच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध होणे हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान व कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे देशाचा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यासाठी, प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज, तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहीत करुन नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे दिनांक १४ ऑगष्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे तिरंगा देशभक्ती दौड चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व करवीर वासियांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeuv2F2taAUC9yF1awJ-vzAylKEe3EYA2VEhfvtQmX5IqjdPA/viewform या लिंकवर उस्फुर्तपणे आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
तिरंगा देशभक्ती दौड 2024 चा मार्ग पुढील प्रमाणे- पोलीस ग्राउंड येथून आरंभ होणार असून पुढे पितळी गणपती, धैर्यप्रसाद चौक, आदित्य कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, सी.पी.आर. चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी मंडप व बिंदू चौक व परत पोलीस ग्राऊंड असा धावण्याचा मार्ग राहणार आहे. यामध्ये 3 कि.मी, 5 कि.मी. व 10 कि.मी. धावण्याचे अंतर राहणार आहे.
3 कि.मी. साठी धावण्याचा मार्ग- पोलीस ग्राऊंड येथून आरंभ होणार असून पुढे पितळी गणपती, धैर्यप्रसाद चौक, आदित्य कॉर्नर व परत पोलीस ग्राऊंड असा आहे.
5 कि.मी. साठी धावण्याचा मार्ग- पोलीस ग्राऊंड येथून आरंभ होणार असून पुढे पितळी गणपती, धैर्यप्रसाद चौक, आदित्य कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय व परत पोलीस ग्राऊंड.
10 कि.मी. साठी धावण्याचा मार्ग- पोलीस ग्राऊंड येथून आरंभ होणार असून पुढे पितळी गणपती, धैर्यप्रसाद चौक, आदित्य कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, सी.पी.आर. चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी मंडप, बिंदू चौक व परत पोलीस ग्राऊंड असा आहे.
0 Comments