Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगली कॉलेज कॉर्नर जवळ कॉलेज तरुणीवर कोयत्याने हल्ला.

 सांगली कॉलेज कॉर्नर जवळ कॉलेज तरुणीवर कोयत्याने हल्ला.

------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम 

------------------------------------

सांगली:  मधील कॉलेज कॉर्नर जवळ 8:30 दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या घटनेनं खळबळ उडाले आहे. सांगलीमध्ये भर रस्त्यात महाविद्यालयीन तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत तरुणी जखमी झाले आहे. विशेष म्हणजे हा चाकू हल्ला तिच्या पतीने केला आहे. घटनेनंतर आरोपींनं घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालय समोर एका तरुणीवर तिच्या पतीनेच चाकू हल्ला केल्याचे घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केले. प्रांजल काळे असे या हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर संग्राम शिंदे असं हल्लाखोराचे नाव आहे. सहा महिन्यापूर्वीच संग्राम शिंदे यांच्याशी तिचा प्रेम विवाह झाला होता. 

त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते. यापूर्वी संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती. त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात प्रांजल जखमी झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Post a Comment

0 Comments