केशवराव नाट्यगृहाचे विदारक दृश्य पाहून कलेवर नितांत प्रेम करणारे डॉ. सुजित मिणचेकर गहिवरले.
------------------------------
कुंभौज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
असंख्य नाट्य कला प्रेमींचे हक्काची जागा असणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या नाट्यगृहला आचानक आग लागल्याचे समजताच कोल्हापुरांच्या व कलेवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दाटून आल्या. ऐतिहासिक नाट्यगृह आगीच्या लोटात पूर्ण जळून गेले या घटनास्थळी मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तेथील वस्तूस्थिती पाहून ते गहिवरून गेले, कलेवर नितांत प्रेम व श्रद्धा असल्याने गेल्या ४३ वर्ष्यापासूनच्या अनेक कार्यक्रमांच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि त्यांचे डोळे पाणावले.
यावेळी त्यांच्यासोबत ॲड. इंद्रजित चव्हाण, दिनेश माळी, केशवराव भोसले नाट्यगृहचे व्यवस्थापक तसेच फायर विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
0 Comments