भारतीय जनता पार्टीच्या वतीने बदलापूर घटनेचा जाहीर निषेध गारगोटी येथे झाले जाणीव जागर अभियान .
------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
------------------------------
बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेचे समर्थन भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही पण महाविकास आघाडी या विषयात राजकारण करत आहे .भारतीय जनता पार्टी या विषयात कधीही राजकारण करत नाही . या घटनेचा निषेध करावा तितका थोडाच आहे आणि बदलापूर मध्ये अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शिफारस केलेली आहे . असे असताना महाविकास आघाडी या घटनेमध्ये राजकारण करत आहे भारतीय जनता पार्टीला या घटनेमध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही . महाराष्ट्रातल्या लेकींना संरक्षण मिळावं महाराष्ट्रातल्या लेकींची सुरक्षितता राहावी यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार नेहमीच आग्रही राहील . अशा पद्धतीचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जाणीव जागृती अभियानामध्ये ते बोलत होते. गारगोटी येथील हुतात्मा स्मारक परिसरात हे अभियान राबवण्यात आले .
बदलापूर बरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील शिये या ठिकाणी सुद्धा असे गैर कृत्य झालेले आहे . त्याचाही निषेध यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला .
यावेळी हुतात्मा स्मारक परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नारी शक्तीच्या सन्मानाची शपथ घेतली .
यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर प्रा . धनाजी मोरस्कर वसंतराव प्रभावळे विलासराव बेलेकर नामदेव चौगुले संतोष पाटील रणजीत आडके राहुल चौगुले बाजीराव देसाई भगवान शिंदे सुनील तेली सुनील पाटील निवास देसाई विनायक परुळेकर अशोक येलकर अमोल पाटील विक्रम पवारसचिन देसाईअजित देसाई मोहन सूर्यवंशी रमेश रायझादे एकनाथ पाटील सुजन निंबाळकर अवधूत राणे विठ्ठल चौगुले अमृत गुरव शिवाजी रामाने पांडुरंग वायदंडे सचिन हळवणकर विनायक शिंदे संतोष बरकाळे सुरेश किल्लेदार मारुती बरकाळेजयराम कांबळे बाबुराव पिंगळे योगेश मुधाळकर मुस्तफा शेख लखन लोहार प्रवीण पाटील दीपक पाटील रामभाऊ पाटील वीरकुमार पाटीलयांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments