Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठल सरनाईक व खुशालराव राठोड यांना नॅशनल बिल्डर अवार्ड या पुरस्काराने सन्मानित.

 विठ्ठल सरनाईक व खुशालराव राठोड यांना नॅशनल बिल्डर अवार्ड या पुरस्काराने सन्मानित.

------------------------------------

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर 

------------------------------------

...ईनर व्हिल क्लब शाखा वाशिम या सामाजिक प्रतिष्ठानाद्वारे  शिक्षण तथा सामाजिक क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना नेशन बिल्डर अवार्ड या नामांकित पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक तथा सामाजिक कार्याची दखल घेत श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रिसोड येथील कलाशिक्षक विठ्ठल सरनाईक यांना शैक्षणिक कार्यासाठी तसेच खुशालराव राठोड यांना सामाजिक कार्यासाठी ईनर व्हिल क्लब, वाशिम द्वारे तिरुपती कला व वाणिज्य महाविद्यालय,वाशिम येथे ईनर व्हिल क्लबचे पदाधिकारी सौ. सिमा राठोड, सौ.विजया देशपांडे,डॉ.रेखा मुसळे, प्रा. डॉ. प्रकाश राठोड,  यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 

            विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास तथा कृतिशील शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य तथा लेखन केल्यामुळे विठ्ठल सरनाईक यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील बावीस वर्षापासून विठ्ठल सरनाईक हे विद्यार्थी घडवण्याचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडत आहेत. रिसोड तालुक्यातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन तथा विविध सेवा पुरवल्यामुळे ईनर व्हिल कल्ब तर्फे त्यांना सन्मानीत केले आहे. कला शिक्षक विठ्ठल सरनाईक यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिक्षक आमदार ॷॅड्. किरणराव सरनाईक तथा संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्राचार्य संजाबराव देशमुख, उपप्राचार्य संजूभाऊ नरवाडे आणि पर्यवेक्षक गजाननराव भिसडे यांनी शाळेच्या वतीने विठ्ठल सरनाईक तसेच खुशालराव राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक वर्गाकडून तथा विद्यार्थी वर्गाकडून विठ्ठल सरनाईक तसेच खुशालराव राठोड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments