Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सचिन दाढेल अर्थशास्त्र विषयात सेट.

 सचिन दाढेल अर्थशास्त्र विषयात सेट.

----------------------------------

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

----------------------------------

               सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मार्फत एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत सचिन दाढेल अर्थशास्त्र विषयात सेट उत्तीर्ण झाले आहेत.  

             स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सचिन व्यंकटी दाढेल हे अर्थशास्त्र विषयात संशोधन (Phd) करत आहेत. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती सचिनने जिद्दीने शिक्षण घेतले. आई-वडील दोघेही निरक्षर असून त्यांनी मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत मुलांना सुसंस्करासह उच्च शिक्षण दिले. वडीलांच्या अपेक्षेला पात्र ठरत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सचिनने सेट परीक्षा उत्तीर्ण केली. अर्थशास्त्र विषयांत सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन सचिन सहाय्यक प्राध्यापक म्हणून पात्र ठरले आहेत. त्यांच्या यशाबद्दल मातंग समाजाचे नेते गणपतराव भिसे, प्रा. भगवानराव लोकडे, माजी नगरसेवक करिम शेख, पुंडलीक दाढेल, काशिनाथ दाढेल, विठ्ठल दाढेल, नागनाथ दाढेल, सुरेश दाढेल, मारोती (छोटू) दाढेल, किशन दाढेल, प्रा. संतोष दाढेल, पत्रकार शिवराज दाढेल आदींनी सत्कार केला.

Post a Comment

0 Comments