जिल्ह्य़ात २९ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश जारी.

 जिल्ह्य़ात २९ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश जारी.

-------------------------------

 कोल्हापूर प्रतिनिधी

-------------------------------

जिल्ह्यात गोकुळाष्टमी व दहीहंडी तसेच यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था  राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१  चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वा. पासून ते दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत

जिल्ह्यात बंदी आदेश जारी केले आहेत

 

हा आदेश ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्या संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा इ. शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही, असेही या आदेशात नमुद आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.