Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नरंदे नागनाथ एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावरती आजपर्यंत संस्थेने कोणत्याही कार्यक्रमास विरोध केला नाही,न्यायालय जो निकाल देईल तो मान्य असेल -चेअरमन प्रतापराव देशमुख..

 नरंदे नागनाथ एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावरती आजपर्यंत संस्थेने कोणत्याही कार्यक्रमास विरोध केला नाही,न्यायालय जो निकाल देईल तो मान्य असेल -चेअरमन प्रतापराव देशमुख..

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे 

------------------------------ 


        नरंदे तालुका हातकणंगले येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटीने शाळेच्या जागेसाठी मैदानावरती सुरू केलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाला काही नागरिक विरोध करत असून ,सदर बांधकाम व मैदानाबाबतची सर्व शासकीय कागदपत्रे आपल्याजवळ उपलब्ध आहेत. परिणामी सदर जागेवरती संरक्षक भिंत बांधत असताना त्या विरोधात काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. परिणामी सदर जागे संदर्भात न्यायालयाचा जो काही निर्णय होईल तो नागनाथ एज्युकेशन सोसायटीला मान्य असेल परिणामी काही नागरिक सदर जागेचा संस्था नरंदे ग्रामस्थांना कोणत्याही पद्धतीचा वापर करू देणार नाही अशी अफवा पसरत आहेत.परंतु सदर जागेवरती आजपर्यंत नरंदे येथील अनेक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत परिणामी ग्रामपंचायतीने सदर न्यायप्रविष्ठ बाबीत जरी कोणी विजय मिळवला तरी सदर जागा ही ग्रामपंचायतीला न मिळता ती कलेक्टर दप्तरी जमा होते. त्यामुळे ग्रामपंचायत नेमकी कशासाठी प्रयत्न करत आहे? असा प्रश्न पडला असल्याचे, मत नागनाथ एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रतापराव देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले 




     नरंदे तालुका हातकणगले येथे नागनाथ एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मैदानावरती सुरू असलेल्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाला नरंदे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यातून विरोध होत आहे .परिणामी सादर बाब न्यायालयात असून न्यायालय जो निर्णय देईल ते संस्थेला मान्य असेल व त्या पद्धतीने कारवाई होईल असेहि मत यावेळी संस्थेचे चेअरमन प्रतापराव देशमुख यांनी पत्रकारांशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केले. सदर जागेबाबत नरदे ग्रामस्थांच्या चुकीचा संदेश पसरवला जात असून सदर , नरंदे गावातील नागरिकांची अनेक महत्त्वाची विकास कामे अद्यापही करणे गरजेचे आहेत त्यावरती लक्ष देणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक शाळेत राजकारण केले जात आहे. परिणामी सदर जागेवरती कोणत्याही पद्धतीचे कार्यक्रम घेण्यास शालेय कामकाजा वगळता आज पर्यंत संस्थेने कधी विरोध केला नाही असेही चेअरमन प्रतापराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments