Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुंभोज रेणुका मंदिरात अश्विनी संदिप माळी परिवाराच्या वतीने कासव देवाची स्थापना.

 कुंभोज रेणुका मंदिरात अश्विनी संदिप माळी परिवाराच्या वतीने कासव देवाची स्थापना.

-----------------------------------

हातकलंगले प्रतिनिधी

 विनोद शिंगे 

-----------------------------------

        कुंभोज तालुका हातकलंगले सत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावण सोमवारी श्रावणाची सुरुवात झाली असून या अनुषंगाने सांगलवाडी येथील कुटुंबीय व कुंभोज गावची कन्या अश्विनी अशोक माळी व संदिप माळी यांच्या प्रेरणेने कुंभोज तालुका हातकणंगले येथील विश्वनाथ बन्ने यांचे  घरासमोरील रेणुका मंदिरात व साक्षात नवसाला पावणाऱ्या रेणुका मातेच्या मंदिरात नवसाचा असणाऱ्या कासवाची स्थापना करण्यात आली, अश्विनी माळी यांनी सदर मंदिरामध्ये बोललेले नवस पूर्ण झाले असून रेणुका देवी ही नवसाला पावणारे असून तिची भक्ती भवाने पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धारणा अश्विनी माळी व संदीप माळी यांनी बोलताना व्यक्त केली. यावेळी कुंभोज येथील ऋषिकेश बाळू स्वामी यांच्या धार्मिक विधी परंपरेप्रमाणे मंत्रोपचाराच्या जयघोषात सदर कासवाची स्थापना मंदिर परिसरात करण्यात आली.यावेळी माळी परिवारासह कुंभोज परिसरातील अनेक रेणुका भक्त मंडळींनी आपली उपस्थिती दाखवली होती.

Post a Comment

0 Comments