सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातडॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी.

 सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातडॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी.

----------------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

----------------------------------------

             सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथील महात्मा फुले ग्रंथालयामध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करणेत आली. सुरुवातीस डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांच्या हस्ते करणेत आले. 

     स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालय परिचर व सामाजिक कार्यकर्ते सात्तापा कांबळे  यांनी केले. तर प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे मा. ग्रंथपाल तानाजी सातपुते सर हे होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जी काही प्रगती झालेली दिसत आहे त्यामध्ये सर्वाधिक मोठे योगदान डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे आहे त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हटलं जाते

    ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवण, त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. ज्या आधारावरच ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला आहे. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे, महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पी. एस. सारंग  इत्यादींनी मनोगत व्यक्त केली.


यावेळी डॉ.एम. ए. कोळी, प्रा. गुरुनाथ सामंत, प्रा. सुशांत पाटील, प्रा. कुंभार मॅडम, प्रा. सामंत मॅडम, प्रा. अर्चना कांबळे मॅडम, ग्रंथालय परिचर संजय भारमल, सदाशिव गिरीबुवा व एन. सी. सी. विद्यार्थी हजर होते. शेवटी सर्वांचे आभार ग्रंथपाल प्रांजली  सातपुते यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.