Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बगडिया महाविद्यालयात पद्मश्री एस . आर .रंगनाथन जयंती साजरी.

 बगडिया महाविद्यालयात पद्मश्री एस . आर .रंगनाथन जयंती साजरी.

------------------------------ 

 रिसोड  प्रतिनिधी 

 रणजीत सिंह ठाकुर 

------------------------------- 

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस आर . रंगनाथन  यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभागाद्वारे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विनोद कुलकर्णी यांनी डॉ. एस आर . रंगनाथन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण

करून अभिवादन केले तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथांचा उपयोग करून वाचन संस्कृतीत कशी भर टाकता येईल याचा आवर्जून विचार करावा व ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या  वाचन साहित्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन अभ्यास करून स्वतःचे जीवन कसे समृद्ध करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगितले .

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा . एस व्ही . टिकार यांनी ग्रंथालयाच्या वाचन कक्षाचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा व स्पर्धा परीक्षा करिता तयारी करावी असे सांगितले

महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ . जयंत मेश्राम यांनी प्रास्ताविक केले व ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या , विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या रिसोर्ससेचा उपयोग करून सक्षम युवक म्हणून महाविद्यालयातून बाहेर पडावे असे मत मांडले . प्रस्तुत कार्यक्रमाला बहुसंख विद्यार्थी तसेच प्रा . बोंडे, प्रा . बुधवंत, प्रा . नंदेश्वर   प्रा. खेडेकर, प्रा. पांढरे,  प्रा. मुंढे,  प्रा.कदम, प्रा. काळे,  प्रा. वानरे , श्री सुनील चऱ्हाटे यांची उपस्थिती होती .

Post a Comment

0 Comments