Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शासन आपल्या दारी या अभियानाचे गावातून होतंय कौतुक.

 शासन आपल्या दारी या अभियानाचे गावातून होतंय कौतुक.

----------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

----------------------------------

मिरज: शासन आपल्या दारी मिरज तालुक्यातील टाकळी मल्लेवाडी आरग बोलवाड या  गावातून अभियानाचे कौतुक करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या योजना हे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. 

महाराष्ट्र शासन आपल्या दारी अभियान हे संपूर्ण मिरज तालुक्यात 65 गावासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. येणाऱ्या दोन दिवसात शासन आपल्या दारी या उपक्रमाचे व्याप्ती वाढणार आहे ग्रामपंचायत सहकारी सोसायटी या ठिकाणी विविध योजनेचे कार्यशाळा राबविण्यात येणार आहे. 

व तसेच गांवा गांवात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मिरज तालुका राष्ट्रवादी क्षेत्राचे अध्यक्ष महादेव दबडे यांनी माहिती दिली आहे. शासनाचे विविध योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचे काम मिरज तालुक्यात चालू आहे त्यामुळे गावागावात राष्ट्रवादी अजितदादा गटाची चर्चा चालू झाले आहे. 

येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण मिरज तालुक्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

लोकांमध्ये जाऊन लोकांचे काही अडीअडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी व त्यानंतर न्याय मिळवून देण्यासाठी जनतेच्या घरापर्यंत जाणार आहे त्यामुळे संपूर्ण मिरज तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुका क्षेत्र प्रमुख यांनी सांगितले आहे....

Post a Comment

0 Comments