Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

केशवनगर येथे आमदार भावनाताई गवळी यांची प्रमुख उपस्थितीत कामगार सभेचे आयोजन.

 केशवनगर येथे  आमदार भावनाताई गवळी यांची प्रमुख उपस्थितीत कामगार सभेचे आयोजन.

---------------------------------- 

रिसोड   प्रतिनिधी

रणजितसिह ठाकुर 

---------------------------------- 

सभेस उपस्थित राहण्याचे बीटी बिलारी यांचे आवाहन.  रिसोड. तालुक्यातील श्री बालाजी साखर कारखाना कामगारांची सभा दिनांक ४ ऑगस्ट रोज रविवार सकाळी ११ वाजता केशवनगर येथील कारखाना साइटवर आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती म्हणून नुकतीच विधान परिषद वर आमदार म्हणून निवड झाली अशा या भागांच्या लोकनेत्या मा, भावनाताई गवळी ह्या उपस्थित राहणार आहेत  यावेळी कारखान्याविषयी शेतकऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्या यावेळी कारखाना कामगार कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत व काही व्यक्तींमुळे ज्यांनी न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केले त्या न्यायालयीन प्रक्रियेवर काही तोडगा काढण्यासाठी व तोडगा काढून कारखाना कसा चालू करता येईल या दृष्टिकोनातून खुद आमदार भावनाताई गवळी ह्या स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घेऊन या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांना यावेळी बोलून त्यावर काय तोडगा काढता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत, त्यामुळे  या सभेसाठी बालाजी  कारखाना कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकारी सभासदांनी त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेणार व त्यावर कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येतील त्या दृष्टीने आमदार भावनाताई गवळी ह्या प्रयत्न करणार आहेत ,सदर कारखाना चालू झाल्यास या भागातील शेतकरी शेतमजूर कर्मचारी यांच्या यांना नक्कीच रोजगार प्राप्त होईल आणि यावेळी कर्मचाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या बाजूने 100% आमदार भावनाताई गवळी या स्वतः काम करणार आहेत व कारखाना चालू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत त्यामुळे या सभेसाठी  उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी बालाजी साखर कामगार सेना युनियनचे अध्यक्ष श्री बि टी बिलारी यांनी केले आहे,

Post a Comment

0 Comments