वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची तांत्रिक अट रद्द, इचलकरंजी येथे साखर वाटप.
------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाटपुराव्या मुळे 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांची अतिरिक्त आणि 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट 1 रुपयांच्या वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची तांत्रिक अट रद्द करावी या प्रश्नी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्याला अखेर यश आले असून मोठा दिलासा मिळाला आहे. आज कॅबिनेट मंत्रीमंडळाचा वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची तांत्रिक अट रद्द करण्याचा कॅबिनेट मंत्रीमंडळाचा निर्णय केल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत करत ताराराणी पक्षाच्या वतीने जनता चौकात साखर वाटप आणि फटाक्यांची आतिषबाजी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, सुनील पाटील, राजगोंडा पाटील, चंद्रकांत कोष्टी, शेखर शहा, श्रीरंग खवरे, चंद्रकांत इंगवले, सतिश मुळीक, राहुल घाट, दत्तात्रय कुंभोजे, राजू कबाडे, नरसिंह पारिक, संजय केंगार, नितेश पोवार, महावीर कुरुंदवाडे, शैलेश गोरे, नंदू पाटील, राजू माळी, राजू देसाई, बंडोपंत लाड, पांडुरंग सोलगे, अनिल बमन्नावर, भारत भोंगार्डे, सागर कम्मे, रमेश पाटील, अरुण निंबाळकर, किशोर पाटील, सुभाष जाधव, अविनाश कांबळे, तानाजी कोकितकर, दिपक केंगार, इमरान मकानदार, शशिकांत नेजे, प्रताप लाखे, बिलाल पटवेगार, आनंदा नेमिष्टे, इरफान अत्तार उपस्थित होते.
0 Comments