Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मतदार बंधू भगिनींनो तुम्ही हाक द्या, साथ आमदार शिंदे कुटुंबीयांची सदैव राहील; सौ.आशाताई शिंदे.

 मतदार बंधू भगिनींनो तुम्ही हाक द्या, साथ आमदार शिंदे कुटुंबीयांची सदैव राहील;  सौ.आशाताई शिंदे.



----------------------------

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

----------------------------

पुणे येथील संवाद बैठकीस हजारो महिला भगिनी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोहा कंधार मतदारसंघातील पुणे शहर व  परिसरात वास्तव्यास  असणाऱ्या मतदार बंधू भगिनींची संवाद बैठक पुणे येथील संकल्प मंगल कार्यालय  येथे काल दि.18 ऑगस्ट रविवार रोजी संवाद बैठक संपन्न झाली, या संवाद बैठकीस  लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे,   सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे , लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा  युवा नेते विक्रांत पाटील शिंदे, सौ. अनुजाताई विक्रांत पाटील शिंदे, कंधार बाजार समितीचे संचालक रोहित पाटील शिंदे, पुण्याच्या नगरसेविका शितल टिळेकर प्रमुख  उपस्थित होते , यावेळी आमदार शामसुंदर शिंदे,  सौ.आशाताई शिंदे, सभापती विक्रांत पाटील शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, यावेळी लोहा कंधार मतदार संघातील मतदारांच्या वतीने आमदार शामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, सभापती विक्रांत पाटील शिंदे, सो अनुजाताई विक्रांत पाटील शिंदे यांचा पारंपारिक खारीक खोबऱ्याचा भव्य हार घालून  सत्कार करण्यात आला ,यावेळी या संवाद बैठकीस उपस्थित असलेल्या पुणे शहर व परिसरातील  हजारो  मतदारांशी आमदार शामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या  सौ.आशाताई शिंदे, सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी हितगुज करून संवाद साधला, यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे संवाद बैठकीत बोलताना म्हणाले की लोहा कंधार मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी स्वस्थ  बसणार नसून लोहा कंधार मतदारसंघांमध्ये गेल्या चार वर्षात अनेक महत्त्वपूर्ण संवेदनशील विषय मी तळमळीने सोडवलेले असून मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य ,वीज,  स्वच्छ पाणी, दळणवळण यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी व मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांमध्ये वाढ होण्यासाठी,व मंजूर झालेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी या भागाचा आमदार म्हणून  सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना दिली ,या संवाद बैठकीस संबोधित करताना सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की आमदार शामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून लोहा कंधार मतदार संघातील अनेक गरजू नागरिकांना आमदार शिंदे यांनी मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठमोठ्या मेट्रो शहरांमध्ये रोजगार  उपलब्ध करून दिलेली असून अनेक लोकांच्या अडीअडचणी प्राधान्याने सोडवलेल्या आहेत, लोहा कंधार मतदारसंघात विविध विकास कामासाठी आमदार शिंदे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे, विष्णुपुरी प्रकल्पाचा प्रलंबित विषया संदर्भात आमदार शिंदे यांनी 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला असल्याने मतदारसंघातील अनेक गावातील शेती सुजलाम सुफलाम होणार असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पानशेवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित विषय आमदार शिंदे यांनी सोडवलेला आहे ,लोहा कंधार मतदारसंघात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली अनेक विकास कामे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे  पूर्ण झालेली आहेत, लोहा कंधार मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न आमदार श्यामसुंदर शिंदे घराण्याचे असून आम्ही लोहा कंधार मतदार 

संघाला मॉडेल मतदार संघ करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही  यावेळी आशाताई शिंदे यांनी संवाद बैठकीत मतदारांशी बोलताना दिली, मतदार बंधू भगिनींनो तुम्ही आमदार शिंदे कुटुंबीयांना हक्काने हाक द्या, आमदार शिंदे कुटुंबीय सदैव तुम्हाला साथ देईल अशी ग्वाही यावेळी आशाताई शिंदे यांनी पुणे येथील मतदार बंधू भगिनी संवाद बैठकीत  बोलताना दिली, यावेळी उपस्थित मतदार बंधू भगिनींनी आमदार श्यामसुंदर शिंदे, आशाताई शिंदे, सभापती विक्रांत पाटील यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे म्हणाले की  विकास करणाऱ्यांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभं राहून त्यांना बळ दिले पाहिजे आणि आपल्या लोहा कंधार मतदारसंघाचा विकास साधला पाहिजे यासाठी मतदारांनी आमदार शिंदे यांच्या पाठीशी भक्कमपणे राहावे असे आव्हान यावेळी विक्रांत पाटील शिंदे यांनी केले,  यावेळी लोहा कंधार मतदारसंघातील व पुणे शहर व परिसरात वास्तव्यास असलेले हजारो मतदार बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने स्वयंस्फुर्तीने उपस्थित होते,  लोहा कंधार मतदारसंघात विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून सौ. आशाताई शिंदे या महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार राहणार असल्याने आमदार शामसुंदर शिंदे व आशाताई शिंदे यांच्या पुणे येथील मतदार बंधू भगिनी संवाद बैठकीस अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे , या संवाद बैठकीस  पुणे शहर व परिसरातील महिला भगिनी मतदार हजारोंच्या संख्येने  उपस्थित होते. पुणे शहर व परिसरातील  मतदार बंधू भगिनींच्या वतीने  सौ.आशाताई शिंदे, सभापती विक्रांत पाटील शिंदे,सौ. अनुजाताई विक्रांत पाटील शिंदे यांचा फटाक्यांची भव्य आतिषबाजी व भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शरद पाटील ,माऊली पाटील, नगरसेविका शितल टिळेकर, माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर, समन्वय समिती सदस्य बालाजी ईसादकर, समन्वय समिती सदस्य सिद्धू पाटील वडजे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते , कंधार संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अवधूत पेटकर, चेअरमन नागेश हिलाल, खांबेगावचे सरपंच संदीप पाटील पौळ, मजरेसांगवी चे सरपंच राम पाटील शिरसाठ, वाकाचे सरपंच गोपीराज पाटील हंबर्डे, धनज चे सरपंच पंजाब पाटील माळेगावे, जोमेगावचे सरपंच आदिनाथ पाटील शिंदे ,  राजू पाटील कापसीकर, मा. सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, सुगावचे  मा.सरपंच  विजय पाटील जाधव, माजी सरपंच पप्पू भुरे, डोणवाडाचे उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, जंगमवाडीचे उपसरपंच अशोक बोधगिरे , प्रदीप पाटील हुंबाड, एजाज भाई भोसीकर,लोहा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशोक सोनकांबळे, अजय हंकारे ,सतीश कराळे सह कार्यकर्ते, पदाधिकारी सह लोहा कंधार मतदारसंघातील व पुणे शहर व परिसरातील हजारो मतदार बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम पाटील कपाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन पाटील कुदळकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments