कारखाना चालू करण्यासाठी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार. आमदार भावनाताई गवळी.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
रिसोड तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेला तत्कालीन श्री बालाजी सहकारी साखर कारखाना आज अवसायनात असून अखेरच्या घटका मोजत आहे ,कारखाना पूर्ववत चालू व्हावा आणि या भागामध्ये नंदनवन व्हावे व शेतकरी शेतमजूर कर्मचारी सुजलाम् सुफलाम् व्हावे ही कित्येक दिवसापासून जनमानसात एक आत्मीयतेची भावना आहे, असे असताना बरेचसे नेते मंडळी आजपर्यंत केशवनगर येथे येऊन कारखाना चालू करण्याचे बऱ्याच लोकांनी आश्वासन दिले, परंतु त्याद्यापही पूर्ण झाले नाही , आतापर्यंत मूळ मुद्द्याला कोणी हात घातला नाही त्यामुळे कारखान्याचा प्रश्न सहजरित्या सोडवणे कोणाला शक्य झाला नाही त्यावर नुकत्याच महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार म्हणून भावनाताई गवळी यांची निवड झाली आणि त्यांनी स्वतःहून केशवनगर साठी येणार असे जाहीर केले आणी ४आगस्ट २०२४रोजी श्री बालाजी साखर कारखाना साइटवर कामगारांची सभा आयोजित करण्यात आली ,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प विठ्ठल महाराज लिंगेकर हे होते ,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार भावनाताई गवळी ह्या होत्या, तसेच प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे ,बालाजी कामगार युनियन चे अध्यक्ष बी,टी बिल्लारी हे होते ,यावेळी सर्वप्रथम भावनाताई गवळी यांचे केशवनगर ला आगमन होताच कर्मचाऱ्यांनी फटाक्याच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत केले ,तसेच भावनाताई गवळी यांनी यांचे केशवनगर येथे आगमन झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम श्री बालाजी मंदिरात बालाजी भगवान यांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी अजून प्रसंगी आमदार भावनाताई गवळी यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने व ग्रामपंचायत च्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,यावेळी बालाजी कामगार सेनेचे अध्यक्ष बी,टी बिल्लारी यांनी आमदार भावनाताई गवळी यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचून दाखवला त्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी (उपदान) पीएफ भावनाताईंनी पुढाकार घेऊन व त्या मुख्यमंत्र्याच्या अतिशय विश्वासू असल्यामुळे त्यांनी साखर कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावे ,व या भागामध्ये शेतकरी शेतमजुरांना एक आधार द्यावा तसेच या भागातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला मातीमोल भाव आहे, या शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला अर्थात सोयाबीनला चांगला भाव मिळाला पाहिजेत यावेळी कर्मचारी वर्गांनी आम्हाला इतर कोणत्याही योजना नको सरकारने आमच्या सोयाबीनला भाव द्यावा व या भागातील बालाजी कारखाना चालू करावा अशी यावेळी भावनाताई समोर मागणी केली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे यांनी बालाजी कारखान्याविषयी पूर्वीचा इतिहास सांगत कारखान्यातील काही गोष्टी काही बाबींना उजाळा दिला आणि बीटी बिल्लारी व महादेवराव ठाकरे यांच्या भाषणानंतर प्रमुख मार्गदर्शन म्हणून आमदार भावनाताई गवळी या पुढे बोलताना श्री बालाजी सहकारी कारखाना ही बाबासाहेब धाबेकर व माझे वडील व पुंडलिकरावजी गवळी यांच्या व संचालक मंडळांच्या पुढाकारातून आणि शेतकऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या भरोशावर ही वास्तू उभी झाली याची मला चांगली जाण आहे,या भागातील साखर कारखाना म्हणजे रिसोड मालेगाव नव्हे तर वाशिम जिल्ह्याची ही शान आहे त्यामुळे आजपर्यंत रिसोड मालेगाव हा माझ्या मतदारसंघात नव्हता त्यामुळे काही अडचणी येत होत्या, परंतु आता महाराष्ट्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी निश्चितच या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे या कारखान्याविषयी साकडे घालून नक्कीच कारखाना चालू होण्यासाठी अगदी मनातून प्रयत्न करणार असल्याचे आमदार भावनाताई गवळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर बोलताना म्हटले, तसेच भावनाताई गवळी यांनी यावेळी जे काही न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्या न्यायालयीन प्रकरणावरही संबंधित याचिका धारकांशी आपण बोलून त्यांना विश्वासात घेऊन मंत्री महोदयासमोर काय तोडगा काढता येईल कारखाना चालू होण्याच्या दृष्टीने काय तोडगा काढता येईल यावर आपण गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे भावनाताईंनी कर्मचाऱ्यांसमोर म्हटले ,तसेच माझी बऱ्याच दिवसापासून ची सोयाबीनला भाव मिळण्याची ही सुद्धा मागणी आहे ती सुद्धा मी सरकारमध्ये रेटून धरणार आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यावरही आपण सहकार मंत्री व संबंधित विभागाशी चर्चा करून पूर्णपणे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदारकी पणाला लाविन असे आमदार भावनाताई गवळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले आहे, यावेळी ह भ प विठ्ठल महाराज लिंगेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रामुख्याने उल्लेख करत सर्वांना एकजूटू राहुन कारखाना चालू होण्यासाठी आपणही भावनाताईंना बळ द्यावायांनी आमदार भावनाताई गवळी यांनी पुंडलिकजी गवळी यांच्या सारखं काम करून कारखान्यासाठी आपला वेळ काढून मंत्री महोदयाशी कारखाना चालू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे म्हणजे या भागाची शान वाढेल असे आपल्या अध्यक्ष भाषणात म्हटले ,यावेळी कार्यक्रमासाठी केशवनगर येथील विठ्ठलराव वसू साहेब, वैभव लिकर्सचे इन्चार्ज रमेशजी नरवाडे ,नावली येथील सरपंच गजाननराव बाजड यांच्यासह केशवनगर येथील सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भास्कर दाभाडे सरांनी मानले
0 Comments