‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून केला स्वातंत्र्यदिन साजरा.
‘किसन वीर’ च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून केला स्वातंत्र्यदिन साजरा.
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
वाई: दि. १५ ऑगस्ट
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रीन क्लब च्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. जागतिक तापमान वाढ ही आज जगासमोरील मोठी समस्या आहे. त्या समस्येला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. याला अनुसरून महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला.
प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, हरेश कारंडे, ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. राजेश गावीत यांनी नियोजन केले. याप्रसंगी एन.एस. एस. चे सल्लागार प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंत कणसे, प्रा. भीमराव पटकुरे यांची उपस्थिती होती. वृक्षारोपणात कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील एन.एस. एस.च्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
Comments
Post a Comment