Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभेसाठी लोकसभेचे ३४०६ कंट्रोल युनिट निकामी केले: "भेल"च्या अभियंताच्या१५ दिवसापासून अमरावती डेरा.

 विधानसभेसाठी लोकसभेचे ३४०६ कंट्रोल युनिट निकामी केले: "भेल"च्या अभियंताच्या१५ दिवसापासून अमरावती डेरा.

-------------------------------------

 फ्रंटलाईन्  न्यूज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी.एन.देशमुख.

-------------------------------------

अमरावती. निवडणूक साठी प्रशासकीय तयारी सुरू झाली असून जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत वापरलेले ३ हजार ४०६ कंट्रोल युनिट (सीयु) निकामी केलेआहे. सदर सी यु मधील डाटा नष्ट करण्यासाठी (निकामी) गेल्या १५ दिवसापासून बंगरूळ येथील"भेल"कंपनीच्या १५ अभियंत्याची जम्मू या ठिकाणी तळ ठोकून होती. विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या एकूण सियुच्या ऐकुन संख्या२७ टक्क्यांनी अधिक आहे. दिवाळीनंतर केव्हाही विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो

जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, मोर्शी-वरुड, चांदुर रेल्वे-धामणगाव, दर्यापूर, चांदूरबाजार-अचलपूर, मेळघाट, तिवसा या आठ मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी सहा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात तर मोर्शी-वरुड आणि चांदुर रेल्वे-धामणगाव रेल्वे हे दोन मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघात आहे. या सर्व मतदारसंघाच्या मतदार यादी ला अंतिम स्वरूप देण्यासाठी ते मतदान यंत्र तयार करण्यापर्यंतची सर्व कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. भारत निवडणूक आयोगाचे तसेच निर्देश आहेत. त्यामुळे मतदान केंद्र निहाय बी एल ओ, नूडल अधिकारी आदींची निवड प्रक्रिया यापूर्वीच पार पडली असून येत्या काळात मतदान आणि मतमोजणीसाठी मनुष्यबळ जुळवले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या निदर्शनानुसार या विभागाचे उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे आणि नायक तहसीलदार प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षीय निवडणुकीचे कामे सुरू आहेत. राजकीय पक्षप्रतिनिधीची साक्ष असून, सी यु रिकामी केल्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीच्या उपस्थिती सीयु आणी बियुची(बॅलेट युनिट) प्रथम टप्पा चाचणी ही (फर्स्ट लेवल चेकिंग/एफ एल सी) पूर्ण करण्यात आली आहे. भविष्यात या यंत्राबाबत कोणाचीही तक्रार असू नये, यासाठी संबंधित त्यांना या प्रक्रियेचे साक्षीदार करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. अंतिम मतदार तयार पण नोंदणी सुरू. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादीची घोषणा केली. परंतु तरीही पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत आपले नावे समाविष्ट करता येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या १५ दिवस आधीपर्यंत नावे नोंदणाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादीची घोषणा केली परंतु तरीही पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत आपले नावे समाविष्ट करता येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या १५ दिवस आधीपर्यंत नावे नोंदणी नोंदविणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

Post a Comment

0 Comments