कुंभोज परिसरात साथीच्या आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
कुंभोज परिसरात साथीच्या आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
-------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------
पावसाळ्यातील साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी , ग्रामपंचायत कडून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून घरोघरी सर्दी, खोकला आणि तापीचे रुग्ण आढळून येत आहेत.
यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर व्हायरल इन्फेक्शनचे डेंग्यू, चिकनगुनिया, टायफाईड, गोचीडताप या आजारामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या महिनाभरापासून कुंभोजसह परिसरात कमी अधिक स्वरूपात पाऊस होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. हिवतापाचा प्रादुर्भाव ऍनफिलीस डासामुळे तर डेंग्यूचा प्रादुर्भाव हा एडीस इजिप्ती डासांमुळे होते.
घर व परिसरात पडलेले भंगार, मोकळी भांडी, खड्डे, घरातील कुंड्या, नारळाच्या कवट्या, टायर यामध्ये पाणी साचते. हिच ठिकाणे डासांची उत्पत्तीस्थाने बनत आहेत. ग्रामपंचायत कडून सूचना देऊनही नागरिक याकडे गांभिर्याने पाहत नाहीत. साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांनी घर व परिसरातील डास उत्पत्तीची ठिकाणी नागरिकांनी नष्ट करणे गरजेचे आहे
ग्रामीण भागात अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या महिनाभरात १८ रुग्ण आढळून आले. दैनंदिन स्वच्छतेकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने डेंग्यूचा फैलाव अधिक वाढल्याच्या तक्रारी आहेत.
Comments
Post a Comment