मुरगुडचा राष्ट्रीय मल्ल विजय डोईफोडे पुण्यातील अपघातात गंभीर जखमी : मदतीचे आवाहन.
-----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------
येथील मंडलिक आखाड्याचा राष्ट्रीय मल्ल विजय जिजाबा डोईफोडे हा पुण्यामध्ये आपल्या गुडघेदुखीवर उपचार करुन घेण्यासाठी जात असताना भिषण अपघात होऊन गंभीररित्या जखमी झाला. खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहे. मात्र डोक्याला गंभीर इजा होऊन सध्या तो कोमा अवस्थेत असल्यामुळे पुढील उपचारासाठी मोठा खर्च आहे. या कामी मदतीचे आवाहन विजयचे कुटुंबीय, कोच दादासो लवटे व वस्ताद सुखदेव येरुडकर यांनी केले आहे.
विजयने आत्तापर्यंत ऑलइंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत रौप्य, ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पटना, बिहार येथे कांस्य, वाराणसीच्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धेत सुवर्ण, लातूर येथील खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक तसेच कोथरूड,पुणे येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ८६ किलो वजन गटात सलग तीन वर्ष सुवर्णपदक, बालेवाडी, पुणेत रौप्य, धाराशिवला रौप्य, बालेवाडी,पुणेतील मिनी ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची अशी झंझावती कामगिरी केली आहे.
कुस्तीतील सरावा दरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीवर फिजिओथेरपीचा उपचार करुन घेण्यासाठी पुण्यातील एका वैद्याकडे दुचाकीने जाताना विजयचा परवा भीषण अपघात झाला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गेल्या दोन दिवसात सहा लाख रुपये उपचारासाठी खर्च झाले आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातील विजयला पुढील उपचारासाठी मोठ्या रकमेच्या मदतीची गरज आहे. क्रीडाशौकिन व दानशूर व्यक्तीनी यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मदतीसाठीचे बँक डिटेल्स
NAME - BABALO JIJABA DOIPHODE.
BANK NAME - STATE BANK OF INDIA (SBI)
A/C NUMBER - 35925751061
IFSC CODE - SBIN0000284
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
0 Comments