सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या बेकायदेशीर बांधकाम धारकाविरुध्द कारवाई न केल्यास आत्मदहनाचा इशारा.
---------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
सन्माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या SPL no 10001/2018 मधील दिनांक 03/05/20218 आदेशानुसार मौजे उंचगाव व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वादग्रस्त हद्दीतील तावडे हॉटेल ब्रिज ते गांधीनगर चिंचवाड रोडवर दुतर्फा बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे
तरीपण गट नंबर 96/4/अ/2 बाळासो रामचंद्र मन्नाडे 2)गट नंबर 96/5 बाळासाहेब नेमाना खोत, आण्णासाहेब नेमाना खोत, चंपा बाई नेमाना खोत, बापुसाहेब नेमाना खोत,सनी बाळासाहेब खोत,अमीत बाबासाहेब खोत यांच्या सामाईक क्षेत्रात व गट नंबर 99/अ सुभाष रेवाचन हिंदुजा वगैरे या सर्वांनी बेकायदेशीर बांधकाम करुन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन गुंडांच्या पोलीसांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या आशिर्वादाने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधकाम सुरु केले असुन सदर संपुर्ण गट नंबर 96 /4/अ/2 व 96/5 व 99/अ इतर गट नंबर ब्ल्यू व रेड झोन मध्ये येत असून कोल्हापूर महानगरपालिका ना विकास क्षेत्रात सामाविष्ट केलेले आहे तरीपण अनेक गुन्हेगारी व आधीकारी यांच्या जिवावर बेकायदेशीर बांधकाम सुरू असून त्या बेकायदेशीर बांधकाम धारकाविरुध्द व बेकायदेशीर बांधकामावर कायदेशीर कारवाई न करणार्या आधीकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास दिनांक 21/08/2024 व 23/08/2024 रोजी कोल्हापूर महानगरपालिका समोरील पटांगणात आत्मदहन करण्याचा इशारा दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे व सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळकृष्ण सुतार यांनी दिलेला आहे
0 Comments