कौलव शाळेतील लोकसहभाग कौतुकास्पद गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारे.
-----------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-----------------------------------
केंद्रशाळा कौलव येथील पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी केलेला लोकसहभाग हा कौतुकास्पद आहे. शाळांच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा असे मत राधानगरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे यांनी व्यक्त केले.
केंद्र शाळा कौलव येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात मुलांना बसायला बेंच नव्हते म्हणून भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर आणि मुख्याध्यापक पंडित चव्हाण सर यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे मागणी करूनही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून,कौलव शाळेचे आदर्श शिक्षक शाहू चौगले सर यांच्या आवाहनास सकारात्मक पालकांनी प्रतिसाद देऊन शाळेचे माजी विद्यार्थी प्रा विश्वास सोनाळकर,डी बी कांबळे,निवास पाटील यांनी पंचवीस हजार रुपयांचे अवघ्या महिनाभरात लाकडी बेंच उपलब्ध करून दिले. त्या बेंचचा प्रधान समारंभ आणि दानशूर पालकांचा सत्कार समारंभ असा संयुक्त कार्यक्रम कौलव येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली.
यावेळी राधानगरीचे गटशिक्षण अधिकारी मा. दीपक मेंगाने साहेब म्हणाले, ज्या संस्थांच्या मागे लोक उभे राहतात त्या संस्था टिकून राहतात. त्यांचा विकास होतो. समाजातील चांगल्या माणसांनी अशा शैक्षणिक संस्था टिकण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी पुढाकार घ्यावा.
इयत्ता पहिलीच्या वर्गाचे बेंच, तसेच शाळेतील पहिली ते सातवीच्या वर्गातील पालकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेले चप्पल स्टॅन्ड, डस्टबिन याबद्दल पालकांचेही कौतुक करण्यात आले.
शाळेच्या शिक्षक वृंदाने प्रत्येकी पाच व शाळा व्यवस्थापन समितीने प्रत्येकी पाच याप्रमाणे शाळेस खुर्च्या दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचा व शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य इयत्ता पहिलीचे पालक ,मुख्याध्यापक पंडित चव्हाण सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जी पाटील यांनी केले.शेवटी आभार मुख्याध्यापक पंडित चव्हाण यांनी मानले
0 Comments