कुपवाड महानगरपालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात.

 कुपवाड महानगरपालिकेचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात.



---------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम 

--------------------------------

मालमत्ता असेसमेंट उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारल्याप्रकरणी मनपाच्या कर विभागातील दोघे कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणी कनिष्ठ लिपिक इम्रान अब्दुल रहमान देसाई (वय 35 ,रा. उदगाव वेस, झेंडे महाराज मठाजवळ,मिरज ) आणि शिपाई राजेश संजीवन मोरे (वय 52रा. मोरे बिल्डिंग, महादेव मंदिराच्या पाठीमागे, चंदनवाडी, मिरज) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

घटनेची माहिती अशी की, तक्रारदार यांनी काही मालमत्ता खरेदी केली होती. त्याचे असेसमेंट उतारावरील त्याच्या काकाचे नाव कमी करून स्वतःच्या नावाची नोंद होवुन घरपट्टीची आकारणी करण्यासाठी तक्रारदार यांनी महापालिकेच्या कर विभागातील कनिष्ठ लिपिक इमरान देसाई यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी लिपिक देसाई यांच्यासह शिपाई राजेश मोरे यांनी तक्रारदाराकडे एक हजाराची मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला होता.

सदर तक्रारीचे सहनिशा केली हसता यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले. लिपिक देसाई यांना लाज देण्यासाठी शिपाई राजेश मोरे यांनी प्रोत्साहित केल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मंगळवारी दि.6 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास कुपवाड कार्यालयातील कर विभागात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक भिलारे यांच्या पथकाने सापळा लावला. यावेळी दोघा संशयितानी  तक्रार दार त्यांच्याकडे लाचेची मागणी करून एक हजाराची रक्कम स्वीकारताना पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना रंग हात ताब्यात घेतले. दोघांविरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे..

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.