धक्कादायक!सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,मुंबई पुन्हा हादरली.

 धक्कादायक!सुरक्षारक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ,मुंबई पुन्हा हादरली. 

------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

------------------------------

राज्यात विकृत नराधमांचे हे प्रकार वाढतच चालले असून संपूर्ण महाराष्ट्रातच संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलींनाही हे नराधम सोडत नाहीत. हे सगळं कमी की काय म्हणून आता मुंबईतून पुन्हा असाच एक संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमारतीच्या सुरक्षारक्षकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याची हे धक्कादायक घटना ओशिवरा परिसरात घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षाचे असून इमारतीच्या सुरक्षारक्षकानेच तिच्या अत्याचार केला आहे. तो तिला जबरदस्ती बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि तिथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर आल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पाॅक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पोलिसांनी 37 वर्षाच्या आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.