Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाईच्या ऐतिहासिक नागमंदीरात पारंपारिक पद्धतीने नागपंचमी उत्सव साजरा.

 वाईच्या ऐतिहासिक नागमंदीरात पारंपारिक पद्धतीने नागपंचमी उत्सव साजरा.

-----------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

-----------------------------------

9/08/2024   वाई शहर व वाई तालुक्यात नागपंचमी उत्सव पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.वाईच्या कृष्णा नदीवरील  धर्मपुरी घाटावर पेशवेकालीन असलेले नाभिक समाजाचे प्रसिद्ध दगडी नागोबा मंदिर आहे.येथे  दरवर्षी नागपंचमी या दिवशी परंपरेने हजारो महिला दर्शनासाठी येतात पोवळे बांधून नागोबाचे पूजन करतात. लगतच असलेल्या हरिहरेश्वर मंदिरात व घाटावर महिला पारंपारिक झीम्मा फुगडी वैगरे खेळ खेळतात..  किसनवीर चौकापासून वाईतील प्रमुख रस्ते भावीकांनी गजबजलेले असतात.यावेळी पावसाने उघडीप दिलेमुळे शहराला यात्रेच्या स्वरूपी येत आले होते.ठीक ठिकाणी बाल गोपाळांसाठी खेळणी,मिठाई, फुगे वगैरे अनेक प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. दगडी नागोबा मंदिरात सकाळी  वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाज वाई यांजकडून पारंपरिक पध्दतीने पूजन करणेत आले.. मानकऱ्यांच्या हस्ते   अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले...  महीलांच्या अफाट गर्दीमुळे दुपारनंतर केवळ महिलांनाच प्रवेश देण्यात येत होता.  संघटनेचे स्वयंसेवक भाविकांना प्रसाद व पोवळे वाटत होते. परंपरेनुसार नाभिक समाज बांधव सर्व सलून दुकाने बंद ठेवून या उत्साहात सर्वजण योगदान देतात.  संघटनेचे  स्वयंसेवक नियोजनबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करत सुरक्षेच्या दृष्टीनेही काळजी घेत होते.वाई पोलिस स्टेशनने   कडक बंदोबस्त ठेवला होता.

 यावेळी वीर जीवा महाले नाभिक संघटना नाभिक समाज  संघटनेचे अध्यक्ष श्री.उमेश(महेश) जाधव, संस्थापक श्री.अशोकदादा सुर्यवंशी,  वाई तालुका अध्यक्ष- संपतराव सूर्यवंशी,शहराध्यक्ष श्री.निनाद तावरे मानकरी-श्री शांताराम सूर्यवंशी,श्री.अतुल सूर्यवंशी श्री.विकास सूर्यवंशी श्री.शंभू सूर्यवंशी श्री.उत्तम सूर्यवंशी श्री.अमित सूर्यवंशी श्री.दीपक सूर्यवंशी श्री .राजेंद्र सूर्यवंशी  श्री.नाना सूर्यवंशी श्री.विजय पप्पू सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी,स्वप्निल सुर्यवंशी,ओंकार सूर्यवंशी सुनील तावरे, रमेश सूर्यवंशी जीवन चव्हाण, दत्तात्रय सुर्यवंशी,मोहन सुर्यवंशी,अंकुश पवार, विकी पवार, योगेश सूर्यवंशी, विवेक तावरे, अमर  सूर्यवंशी,अशोक राऊत, कुणाल तावरे,नितीन सुर्यवंशी,श्री रमेशराव जाधव,श्री रवि क्षिरसागर, सचिन तावरे, ऋषिकेश कदम, अनिल  पवार, संतोष तावरे,अमोल तावरे,शंकर सुर्यवंशी,संजय पवार,सागर सुर्यवंशी, प्रकाश तावरे,अक्षय सुर्यवंशी वैगरे अनेक कार्यकर्ते,समाज बांधव कार्यक्रम पार पाडण्यास कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments