"रिसोड तालुक्यातील राशंन दुकानदार व ग्राहकांमध्ये संघर्षाच्या ठिणग्या?"
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
रिसोड तालुक्यात दि.५/८/२०२४ रोजी रिसोड तालुक्यातील सर्व राशन दुकानातील राशन दुकानदारा जवळील ईपॉश मशीन सर्वर डाऊन मुळे व इंटरनेट सेवा सुरळीत चालत नसल्यामुळे ईपाॅश मशीन बंद स्थितीत आहेत. यामुळे धान्य वाटपात अडथळा निर्माण होत आहे. रिसोड तालुक्यातील सर्व राशन दुकानदार व ग्राहकांमध्ये सतत संघर्ष होत आहेत. या संघर्षामुळे तालुक्यातील सर्व राशन दुकानदारांनी आपल्या ईपाॅश मशीन रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांचे कार्यालयात जमा करण्यासंदर्भात सर्व राशन दुकानदार एकवटले व सर्व ई-पॉस मशीन तहसील मध्ये घेऊन येत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांची भेट घे निवेदन देऊन मशीन जमा करून करून घेण्यासंदर्भात विनंती केली. परंतु तहसीलदार मॅडम यांनी दोन-तीन दिवस आपण वेळ द्या याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे बोलतांना सांगितले परंतु प्रत्येक गावात राशन दुकानदार सोबत होत असलेल्या ग्राहकाच्या भांडणाला व बोलण्याला कंटाळून राशन दुकानदार ईपाॅश मशीन तहसीलदार मॅडम यांनी जमा करून घ्याव्यात याबद्दल ठाम होते. याबाबत तालुक्यातील जवळपास ११६ राशन दुकानदार तहसील कार्यालयात आपल्या मशीन सह उपस्थित होते. याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांना दिले. याबाबत या अगोदर प्रधान सचिव यांचे सोबत झालेल्या बैठकीत सुद्धा २५ जुलै २०२४ रोजी माहिती देण्यात आली, परंतु अद्याप पर्यंत यामध्ये शासनाकडून तोडगा काढण्यात आला नाही.रिसोड तालुक्यातील सर्व त्रस्त राशन दुकानदार मेटाकुटीस आले. व तालुक्यातील राशन दुकानदाराचे सर्व ग्राहक सुद्धा ईपाॅश मशीन चालत नसल्यामुळे धान्य मिळत नाही व मजुरी बुडत असल्याने राशन दुकानदार सोबत संघर्षाच्या ठिणग्या पडत आहेत. तालुक्यातील राशन दुकानदाराचे तालुकाध्यक्ष खुशालराव लांडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
0 Comments