तब्बल साठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अणुस्कुरा घाटातील वाहतुक सुरळीत सुरू.
---------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------
शाहुवाडी : अणुस्कुरा घाटात शनिवार दि . २४ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळून घाट रस्ता बंद झाला होता तिच दरड आज सोमवार दिनांक २६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान रोड रिकामी करून ६० तासांच्या अथक परिश्रमाने वाहतूक सुरू करण्यात आली
असून सदर मार्ग वाहतुकीसाठी चालू झाल्याचे सांगण्यात आले आहे
अणुस्कुरा घाटातील ही दुसरी घटना आहे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी वाहण धारकांतून होत आहे घाटात तब्बल तीन दिवस भर पावसात दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. मार्गांवरील वाहतूक सुरु होण्यास अनेक अडथळे निर्माण झाले होते. माती हटवताना मातीच्या ढीगाऱ्याखाली मोठे दगड असल्याने व दगडांचा आकार मोठा असल्याने ते तीन ते चार वेळा ब्लास्ट करून हटवण्यात आले. सदर मार्ग बंद असल्याने मुंबई हून कोकणात अणुस्कुरा मार्गे होणारी वाहतूक गेले तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पर्यायी मार्ग म्हणून अनेकांनी यावेळी मलकापूर मार्गी येणाऱ्यांनी आंबा घाट व मलकापूर करंजफेण कळे गगनबावडा असा मार्ग निवडला होता. तर कोल्हापूर हुन येणाऱ्या लोकांनी कळे गगनबावडा व कळे भोगाव करंजफेण मलकापूर आंबा घाट असा मार्ग निवडला प्रशासनाने योग्य ठिकाणी फलक न लावल्याने वाहन धारकांना नाहक त्रास झाला
गेल्या दोन तीन वर्षात लोकांना मुंबई हून कोकणाकडे येणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गाची माहिती मिळाल्याने अनेक लोक या मार्गाने कोकणात येतात, पुणे कोल्हापूर हून राजापूर सावंतवाडी ला येण्यासाठी देखील हा मार्ग लोकांना सोईचा वाटतो.
दिवसभरात पाचशे ते सहाशे वाहनांची वर्दळ या मार्गावर असते सणासुदीला तर हजारोच्या संख्येने या मार्गावर वाहतूक होत असते . अश्यावेळी दर पावसाळ्यात अणुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात तसेच अनेक अपघातही होत असतात तरी सार्वजनिक बांधकाम विभाग या घाटाच्या सुरक्षितेकडे गांभीर्याने लक्ष देत नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभागाणे सुरक्षेतेच्या कारणाने गांभीर्याने लक्ष दयावे अशी मागणी वाहन धारक व प्रवाशी वर्गातून जोर धरतआहे . हे जर असंच राहिले तर एखाद दिवशी दरडीखाली मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारू शकत नाही अशी भीती व्यक्त करण्यात येतं आहे.
0 Comments