Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उंचगाव पूर्व शांतीनगर कॉलनी मध्ये विविध सामाजिक उपक्रम.

 उंचगाव पूर्व शांतीनगर कॉलनी मध्ये विविध सामाजिक उपक्रम.

-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

विशाल फुले

-------------------------------

तालुका करवीर उचगाव पूर्व येथील, लोकराजा ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,कॉलनीतील शांतीनगर येथील फासेपारधी समाज राष्ट्रभक्ती, एकात्मता यासह विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा अंकुर फुलवण्याचं काम,

करीत आहेत. विविध सण- उत्सवाच्या माध्यमातूनही देशाची संस्कृती जोपासण्याचे कार्य गेल्या २०  वर्षांपासून ,आमदार सतेज पाटील ,आमदार ऋतुराज  पाटील व विद्यमान माजी सरपंच, गणेश काळे,माजी सरपंच मालुताई काळे

,यांच्या मार्गदर्शनाने फासेपारधी समाजाच्या वतीने अविरतपणे सुरू आहे. यंदा "प्लॅस्टिक'चा दुष्परिणाम या ज्वलंत विषयावर आरास करून समाजप्रबोधनाचा वसा कायम ठेवलाय.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून,याही वर्षीसंपूर्ण समाजाच्या वतीनेस्वच्छता मोहीम राबवण्यात आली.प्लास्टिक वापरणे टाळा कापडी पिशवी वापरा असा संदेश देत संपूर्ण गावामध्ये जनजागृती करण्यात आली.

तसेच ग्रामपंचायतीच्या   माध्यमातून 300 झाडे लावायचे उपक्रम सध्याही अजून चालू असून,

यामध्ये अबालृद्धांसह युवावर्ग महिलामोठ्या संख्येने उपस्थित आहेत.समाजातर्फे गेले 40 वर्ष एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत याही वर्षी असाच उपक्रम राबवू असे राजू काळे यांनी सांगितले.

यावेळीअनिल चव्हाण सुरेश चव्हाण रवी काळे राजू काळे मदन चव्हाण तानाजी पवार मारुती चव्हाण बाळू चव्हाण बसप्पा चव्हाण आप्पा काळे मल्लू काळे,राजू चव्हाण यांच्यासह महिला व 200 वर नागरिक उपस्थितत होते.


समाजामध्ये सुसज्ज रस्ते ,अंडरग्राउंड गटारी,सभोवताली हिरवीगार असंख्य झाडी,लग्न समारंभासाठी सुसज्ज हॉल,पाण्याची सोय,ग्रंथालय अशा सर्व सोयी एकाच,ठिकाणी आमदार सतेज पाटील , आमदार ऋतुराज पाटील व माजी विद्यमान सरपंच गणेश काळे यांच्या प्रयत्नातून झाल्यामुळे ,संपूर्ण फासेपारधी समाज समाधान व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments