ॲड.नकुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात युवकांचा भाजप मधे प्रवेश.
ॲड.नकुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात युवकांचा भाजप मधे प्रवेश.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
रिसोड - मोठेगाव येथील युवकांनी भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख उपस्थित होते.
रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे मागील एका वर्षात शेकडो युवक ज्येष्ठ त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रदेशामध्ये सर्व धर्माची जातीची पंथाची लोक नकुल देशमुख यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत आहेत
पंतप्रधान मोदीचे करिष्मा ही नेतृत्व, मोठ्या प्रमाणात होत असलेले विकास कामे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून समाज हिताच्या शेवटच्या घटकाला लाभ होतील अशा कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत सोबतच मोठ्या प्रमाणात राज्यात विकास कामे होत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष संघटनात्मक दृष्ट्या वाढ होत असून मोठ्या प्रमाणात युवक जेष्ठ महिला ह्या भारतीय जनता पक्षाकडे वळत आहेत व पक्ष प्रवेश करत आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी मागील एक ते दीड वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणून गाव वाड्या वस्त्या तसेच शहरांमध्ये अनेक विकास कामे आणली त्यामुळे युवक व ज्येष्ठांचा कल ॲड. नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याकडे वाढत आहे. याच गोष्टीला प्रेरित होऊन मोठे गाव येथील युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख हे उपस्थित होते. नकुल देशमुख यांनी त्यांचे पक्षाचा शेला घालून स्वागत केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment