Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कसबा ठाणे येथील कु. रोहिणी पाटील बनली पोलीस उपनिरीक्षक ( PSI )

 कसबा ठाणे येथील कु. रोहिणी पाटील बनली पोलीस उपनिरीक्षक ( PSI ) 

---------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील 

---------------------------------

     कसबा ठाणे (ता. पन्हाळा )गावातील कु. रोहिणी पाटील ही कुंभी कासारी सह. साखर कारखान्यात डीस्टीलरी विभागात श्री वसंतराव पाटील हे plant opreter या पदावर काम करतात यांच्या मुलीने( PSI -पोलीस उपनिरीक्षक )पदाला गवसणी घालून कसबा ठाणे गावच्या इतिहासात आणखी एक नोंद केली आहे,


         रोहिणी पाटील हिचे प्राथमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर, हायस्कुल चे पर्यंत चे शिक्षण जय शिवराय हायस्कूल, ज्युनियर कॉलेज महाराष्ट्र हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे व ग्रॅज्युएशन B. TECH Agri चे शिक्षण D. y. Patil college of agrikulchar engg & Tech तळसंदे मधून झाले 10 वीत 91.80./. मार्क्स मिळवून पडळ केंद्रामध्ये प्रथम येऊन तेव्हाच आपल्या यशाचा झेंडा रोवणारी कु.रोहिणी आज PSI झाली MPSC च्या परीक्षेस शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर आवश्यक असल्याने रोहिणी ने स्पर्धा परीक्षेबरोबर प्लॅन ' B' म्हणून B Tech agri 2020. साली प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण केले B. Tech agri नंतर नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध असूनही रोहिणी ने MPSC तयारी चालू केली 

            बालपणापासूनच ठरविलेल्या गोष्टी प्रयत्न अंती नक्कीच साध्य होतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली MPSC चा अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय लहानपणापासून माझ्या मनावर बिंबवणारे माझे वडील आदरणीय वसंतराव पाटील व त्यांच्या कस्टाला साथ देणारी माझी आई सौ. संपदा पाटील यांच्या प्रोत्साहाना मुळे आजचा दिवस मी पाहू शकले.


           (PSI - रोहिणी वसंतराव पाटील )

            2022 मध्ये केलेला अभ्यास पूर्वक प्रयत्न आणि याची प्रचिती म्हणजेच तिला भेटलेली पोस्ट याआधी रोहिणी ने 2021/2022 मध्ये कृषी अधिकारी पदाच्या परीक्षाही दिल्या आहेत (महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻 यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन,अजूनही पुढील स्वप्नपूर्ती साठी तिचा अभ्यास सुरु आहे 


         आई वडिलांचा त्याग - 

           

                        श्री वसंतराव पाटील हे कुंभी कासारी कारखान्यात डीस्टीलरी विभागात प्लॅन्ट ऑपरेटर या पदावर काम करतात, फक्त नोकरी करून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करणे शक्य नव्हते म्हणून नोकरी बरोबर चं शेतीतून उपन्न घेऊन त्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले, त्यांचा मुलगा कु. रोहित पाटील हा थाळी फेक खेळातील राष्ट्रीय खेळाडू तसेच त्याचे शिक्षण B. SC agri, MBA एवढे आहे दोघेही मुले अगदी 10 वी 12वी पासून शहरात शिकण्यासाठी त्यांचा दोघांचाही शिक्षणाचा खर्च हा विचार करण्यापलीकडचा, तरीसुद्धा वसंतराव पाटील यांनी त्यांचा स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवत, मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, शैक्षणिक क्षेत्रात केलेली गुंतवणूक ही आयुष्भरासाठी माझ्या सोबत राहिल असेवसंतराव पाटील यांनी 

सांगितले

Post a Comment

0 Comments