वीस वर्षानंतर कुंभोज च्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक रात्री 12 पूर्वी संपन्न.
वीस वर्षानंतर कुंभोज च्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक रात्री 12 पूर्वी संपन्न.
----------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
----------------------------------------
कुंभोज तालुका हातकलंगले येथील ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या गणेश उत्सव तब्बल नऊ दिवसानंतर अत्यंत शांततेत संपन्न झाला. परिणामी गणेशोत्सव कालावधीमध्ये कोणत्याही पद्धतीचे गालबोट न लागल्याने कुंभोज ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. परिणामी यावर्षी जवळजवळ 42 ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यापैकी बऱ्याचशा मंडळांनी विसर्जन व स्वागत मिरवणुकीसाठी डॉल्बीचा वापर केल्याने काही प्रमाणात नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त होत होती. कुंभोज परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात हृदय विकाराचे तसेच बीपी व अन्य आजाराचे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .त्याच पद्धतीने खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल असणारे लोकही मोठ्या प्रमाणात आहेत, परिणामी डॉल्बीच्या आवाजामुळे सदर रुग्णांना दोन दिवस गावापासून दूर ठिकाणी जाऊन वास्तव करावे लागले. यामुळे सदर कुटुंबातील नागरिकांच्यातून गणेशोत्सव मंडळ विसर्जन मिरवणुकी साठी आणलेल्या डॉल्बी बद्दल नाराजी व्यक्त होत असून नऊ दिवस अत्यंत धार्मिक पद्धतीने साजरा केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या शेवट डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने का असा सवाल ही यावेळी अनेक आजारी रुग्णांच्या मधून व्यक्त होत होता.
परिणामी कुंभोज मधून एकाच वेळी जवळजवळ 20 ते 30 तरुण मंडळांच्या मिरवणुका कुंभोज दसरा चौक मार्गे अत्यंत शांततेत एका मागे एक या पद्धतीने निघाल्या, यावेळी सर्वच तरुण मंडळांनी आपल्या गणेशाचे विसर्जन मिरवणुकीत अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत व आनंदोत्सव साजरा केला. यावेळी गावात अनेक ठिकाणी सर्वच गणेश मूर्तींचे स्वागत ग्रामपंचायत कुंभोज जणूसुराज्य, शिवसेना, बीजेपी, काँग्रेस ,शेतकरी संघटना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,अधि कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी नऊ दिवसात कुंभोज येते विद्यमान आमदार राजू बाबा आवळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर दलित मित्र अशोकरावजी माने, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव वारणा दूध संघाचे संचालक काढून पाटील जवाहर कारखान्याचे व्हाई चेअरमन बाबासाहेब चौगुले आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. परिणामी सदर गणेशोत्सव कालावधीमध्ये विद्यमान खासदार धैरशील माने यांचे दर्शन मात्र कुंभोज सह परिसरातील नागरिकांना दुरमीळच झाले.
यावेळी हातकणंगले पोलीस स्टेशनच्या वतीने कुंभोज सह परिसरात मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी हातकणंगले पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले व त्याला कुंभोज येथील तरुण मंडळांनी सहकार्य केले. गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच कुंभोज येथील सर्वच गणेश मंडळांच्या मिरवणुका रात्री बारा पूर्वीच संपन्न झाल्या.
कुंभोजसह हिंगणगाव, दुर्गेवाडी, नेज, शिवपुरी, नरंदे परिसरात 'मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात सुमारे शंभरहून अधिक सार्वजनिक मंडळांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, येथील पन्नासहून अधिक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील,किरण माळी, सरपंच स्मिता चौगुले, बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब डोणे, पोलीस पाटील महमंद पठाण व सूर्योदय युवक संघटना यांनी विर्सजन मिरवणुकीत सहभागी मंडळांना श्रीफळ देऊन सन्मान केला. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोजचे बीट अंमलदार रविकांत शिंदे व सहकारी यांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न झाली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
गेल्या कित्येक वर्षापासून परंपरा असणाऱ्या एक गाव एक गणपती दुर्गेवाडी येथील दुर्गेवाडी च्या राजाची मिरवणूक अत्यंत शांततेने व धार्मिक वाद्यांच्या गजरात गुलाल फुलांची उधळण करत फटाक्याचे आकाश बजी करत निघाली सदर मिरवणूक नक्की मध्ये सहभागी झालेल्या मोठ्या प्रमाणात महिलावर्ग व त्यांनी केलेला गणरायाचा जयघोष बघण्यालायक होता.
Comments
Post a Comment