सांगली: वार्ड क्रमांक 18 मधील कृष्णा कॉलनीत मिश्रित पाण्याचा पुरवठा.
सांगली: वार्ड क्रमांक 18 मधील कृष्णा कॉलनीत मिश्रित पाण्याचा पुरवठा.
-------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------------
कृष्णा कॉलनी आळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष लवकरात लवकर समस्या दूर न झाल्यास हे पाणी अधिकाऱ्यांना पाजू लोकहित मंचा अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह स्थानिक नागरिकांचा इशारा. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 18 मधील आकाशवाणीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या सुभाष नगर मधील कृष्णा कॉलनी मध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आळ्या मिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याने इथल्या स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सदर दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे इथल्या नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी सदर पाण्याची चाचणी करून पाणी दूषित असल्याचे सांगितले आहे परंतु त्यानंतर यावर कोणतेही ठोस उपाययोजना झालेली नसल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.
त्यांनी आपली व्यथा लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्याकडे मांडल्यानंतर मनोज भिसे यांनी या ठिकाणी जाऊन चौकशी करून संबंधित पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून याबाबत कल्पना दिली.
दरम्यान या दूषित पाणीपुरवठा बाबत योग्य ती उपयोजना न झाल्यास हे दूषित पाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा इथल्या स्थानिक रहिवाशांसह लोकहित मंचाचे अध्यक्ष म्हणूनच भिसे यांनी दिला इशारा.
Comments
Post a Comment