प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांचा गृहप्रवेश आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची मार्गदर्शक तत्वे प्रकाशीत.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांचा गृहप्रवेश आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची मार्गदर्शक तत्वे प्रकाशीत.

-----------------------------------------------------

कोल्हापूर महानगरपालिका प्रतिनिधी 

रजनी कुंभार 

-----------------------------------------------------

कोल्हापूर ता.17 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मंगळवारी ऑनलाइन प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थ्यांचा गृहप्रवेश आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची मार्गदर्शक तत्वे प्रकाशीत करण्यात आला. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे पार पाडण्यात आला. याकरीता केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मार्फत या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडीक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, जिल्हा नगरपालिका प्रशासनाचे सहा.आयुक्त देवानंद ढेळके उपस्थित होते.


            यावेळी  खासदार धनजंय महाडीक यांनी आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत एखाद्या गरीबाचे घर पूर्ण होणे ही त्याच्या आयुष्यातील फार मोठी कमाई ठरते. यासाठी कोल्हापूर महापालिकेने व इतर महापालिकेने राबविलेल्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महापालिकेने झोपडपट्टी विकासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.


            प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना शहरात परवडणाऱ्या दरातील घरांच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. आणखीन असे प्रकल्प शहरात व्हावेत याकरीता प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 यात नव्याने जास्तीत जास्त प्रकल्प कोल्हापूर शहरात होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


            यावेळी सामाजिक विकास विशेषतज्ञ युवराज जबडे, एमआयएस विशेषतज्ञ योगेश पाटील, प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकारी, लाभार्थी, जिल्ह्यातील इतर नगरपालिका स्तरावरील लाभार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.