शाहूपुरी पोलीस ठाणेकडून गणेशोत्सव कालावधीत नियमांचे पालन न केल्याने 28डॉल्बी मालक आणि 32गणेश मंडळ अध्यक्ष आणि अन्य यांच्यावर खटले न्यायालयात दाखल.
शाहूपुरी पोलीस ठाणेकडून गणेशोत्सव कालावधीत नियमांचे पालन न केल्याने 28डॉल्बी मालक आणि 32गणेश मंडळ अध्यक्ष आणि अन्य यांच्यावर खटले न्यायालयात दाखल.
-----------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------------
सातारा शहरामध्ये गणेशोत्सव 2024 च्या अनुशंगाने गणेश आगमन ते विसर्जन दरम्यान शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत निघालेल्या गणेश मंडळाच्या मिरवणुका दरम्यान मंडळे व मंडळाचे कार्यकर्ते डॉल्बी मालक चालक यांनी त्यांच्या मंडळाच्या मिरवणुका सार्वजनिक रस्त्यावर जाणीवपूर्वक रेगांळत ठेवणे, जोरजोरात व कर्ण कर्कश्य असे लाऊड स्पिकर वाजवणे त्याच बरोबर जवळपास राहणा-या व येणा-या जाना-या लोकांना अडथळा, गैरसोय, त्रास, धोका पोहचु नये म्हणुन मनाई केलेली असताना देखील व या सर्व गोष्टी न करणेबाबत शाहुपूरी पोलीसांनी लेखी सुचना देवून देखील मिरवणुकीमधे व मिरवणुकीच्या मार्गात जोरजोरात डॉल्बी स्पिकर लावुन लोकाना त्रास होईल असे वर्तन केले म्हणुन 32 सार्वजनीक गणेश मंडळे व 28 डॉल्बी मालक चालक आणि अन्य असे एकुण 63 लोकांवर कारवाई करणेत आली आहे व त्यांचे विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम 36 (ई), 33 (न) प्रामाणे खटले दाखल करून
न्यायालयात सदरचे खटले सादर करणेत आलेले आहेत.
Comments
Post a Comment