पोलीस रेकॉर्डवरील दोघां चोरट्यांकडून पाण्याची पितळी 39 मीटर व इतर साहित्य असा एकूण 1,08,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
पोलीस रेकॉर्डवरील दोघां चोरट्यांकडून पाण्याची पितळी 39 मीटर व इतर साहित्य असा एकूण 1,08,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
---------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.
सध्या कोल्हापूरमध्ये पितळी पाण्याची मिटर चोरीच्या घटना समोर येत होत्या त्या मिटर चोरीच्या तपासासाठी स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या वतीने तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक जालीदर जाधव,सुरेश पाटील,राम कोळी , राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकास गोपनीय बातमी दारा मार्फत अशी माहिती मिळाली की, कोल्हापूर शहर परीसरातील चोरलेली पाण्याची मिटर विकण्यासाठी चोरटे कबनूर ओढ्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गून्हे अन्वेषण विभागाने सापळा रचला असता त्या ठिकाणी प्रदीप मस्के व व 24 रा भगतसिंग गल्ली तारदाळ हा पाण्याच्या पितळी दहा मिटर सह आढळून आला त्याच्या कडे आधीक चौकशी केली असता त्याने पाण्याची पितळी मिटर
बाळू आनंदराव गोसावी, रा. खोतवाडी तारदाळ, ता. हातकणंगले यास विकल्याचे सांगितले म्हणून स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बाळू गोसावी यास ताब्यात घेतले. असता त्याने आरोपी प्रदिप मस्के याचेकडून पितळी मीटर विकत घेतल्याचे कबुल केले त्याचेकडून चोरीची विकत घेतलेली पाण्याचे 29 पितळी मीटर जप्त केले. दोन्ही आरोपीकडे सखोल तपास करुन चोरीची पाण्याची 39 पितळी मिटर व इतर साहित्य असा एकूण 1,08,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
अनं पोलीस स्टेशन गुरनं व कलम चोरीस गेलेली मीटर हस्तगत केलेली सख्या मीटर सख्या 1 जुना राजवाडा 436/2023 भादवि कलम 379 28 26 2 जुना राजवाडा 227/2023 भादवि कलम 379 08 08 3 शाहुपूरी 585/2023 भा द वि कलम 379 01 01 4 शाहुपूरी 430/2024 भादवि कलम 379 01 01 5 लक्ष्मीपुरी 361/2023 भादवि कलम 379 01 01 6 लक्ष्मीपुरी 362/2023 भादवि कलम 379 01 01 7 365/2023 भादवि कलम 379 एकुण 01 01 41 39
दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून पुढील तपासकामी मुद्देमालासह जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, सागर माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, गजानन गुरव व राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment