माजी खासदार संजय काका पाटील यांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना बेदम मारहाण मुल्ला यांच्या 76 वर्षीय आईलाही ढकलून दिले.
माजी खासदार संजय काका पाटील यांची घरात घुसून माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना बेदम मारहाण. मुल्ला यांच्या 76 वर्षीय आईलाही ढकलून दिले.
------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------------
कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केली. यावेळी खासदार व त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला व मुलांनाही मारहाण केली. यावेळी मुलांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईला ही स्वतः खासदारांनी ढकलून दिले.
ही घटना आज सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.
सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी संजय काका पाटील यांचे पीए खंडू होवळे हे मुल्ला यांच्या घरी आले. व संजय काका भेटायला येणार असल्याचे सांगितले. यावेळी मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला तोपर्यंत दारात दोन-तीन गाडी येऊन थांबल्या गाड्या मधून माझे खासदार संजय काका पाटील यांच्यासह दहा-पंधरा जण उतरले. त्यांनी थेट घरात घुसून अय्याज मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या घरातील महिला व मुलांनाही शिवीगाळ करत जबर मारहाण केली.
Comments
Post a Comment