86 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त . दोघेजण ताब्यात स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

 86 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त . दोघेजण ताब्यात स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

--------------------------------------

कोल्हापूर: प्रतिनिधी

 शशिकांत कुंभार 

--------------------------------------

 दिवसा ढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ८६ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी

 कर्नाटकातून कोल्हापूरात येऊन गावाशेजारी बंद असलेली घरे फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या  चोरट्यांच्या मागावर पोलीस काही दिवसांपासून  होते

 कोल्हापूर जिल्ह्यात सीमा वरती भागात घरफोड्यांचे सत्र वाढले होते. त्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून याचा मागोवा घेतला जात होता.स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना  खात्रीशीर माहिती मिळाली कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झालेल्या घरफोडी मधील चोरीचे दागिने विकण्यासाठी एकजण मुरगूडमध्ये  येत असल्याची माहीती खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुरगूड शहरामध्ये सापळा रचला. यावेळी राजू कित्तूरकर रा. इंदिरानगर, हालशी, ता. खानापूर. हा संशयास्पद रित्या त्या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता.  त्यांने त्याचा साथीदार महादेव नारायण धामणीकर रा. कित्तूर, ता. खानापूर, जि. बेळगाव याच्या साथीने दिवसा बंद असलेल्या घरांच्या घरफोड्या केल्याचं कबुल केलं. त्यानुसार पोलिसांनी महादेव धामणीकर यास कर्नाटकात ताब्यात घेतलं. या मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली   स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सपोनि चेतन मसुटगे, सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, पोलीस हवालदार अशोक पोवार, प्रकाश पाटील, सचिन मोरे, हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, समिर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ, प्रशांत कांबळे, राजेश राठोड, संजय कुंभार,  प्रवीण पाटील, सागर माने, राजू कांबळे, श्रीमती संज्योती महामुलकर, यांनी या कामी प्रयत्न केले.


पोलीस अधीक्षक यांचे आव्हान. 

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बँका पतसंस्था व सोनेतारण घेणाऱ्या खाजगी कंपन्या यांनी सोने तारण घेताना मालकी हक्काशिवाय सोने तारण घेऊ नये असे आव्हान केले आहे.

चैनी साठी चोरी.

सदर घरफोड्या करणारे चोरटे हे घरफोडी करुन घरफोडीमधील दागिने फायनान्स कंपनी मध्ये गहाण ठेवून मिळालेली रक्कम गोवा येथे  कसिनो येथे खेळण्यासाठी वापर केल्याचं पोलिसांना सांगितले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.