दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे खरेदी, फिटिंगसाठी सहाय्य योजने (ADIP) अंतर्गत शिबिरांचे आयोजन.
------------------------------------
कोल्हापूर, प्रतिनिधी
-------------------------------------
शासनाच्या दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे खरेदी, फिटिंगसाठी सहाय्य योजने (ADIP) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या मुल्यांकणासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत सहाय्यक उपकरणे उदा. तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल, कृत्रीम पाय, कोठया, रोलेटर, सि.पी. चेअर, श्रवणयंत्र, ब्रेल केन, ब्रेल छडी, ब्रेल स्लेट, ब्रेल किट, सुगम्य छडी, स्मार्ट फोन, कृत्रिम अवयव, कॅलिपर, एडीआयपी किट इ. साहित्य दिव्यांगांना वाटप करण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी, मोजमाप करण्यात येणार आहे.
शिबिर सकाळी ८ ते सायं. ५ या वेळेत होणार असून शिबिरासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांनी पुढील कागदपत्रे सोबत घेऊन यावे. दिव्यांग प्रमाणपत्र (किमान ४०% अपंगत्वासह) किंवा नोंद केलेली पावती, रेशन कार्ड, अधार कार्ड व दोन फोटो.
*शिबिर ज्या तालुक्यात होणार आहे त्या तालुक्याचे नाव व दिनांक पुढील प्रमाणे-*
चंदगड - दि. ४ सप्टेंबर २०२४
आजरा - दि. ५ सप्टेंबर २०२४
गडहिंग्लज - दि. ६ सप्टेंबर २०२४
राधानगरी - दि. ९ सप्टेंबर २०२४
भुदरगड - दि. १० सप्टेंबर २०२४
कागल - दि. ११ सप्टेंबर २०२४
करवीर - दि. १३ सप्टेंबर २०२४
कोल्हापूर शहर - दि. १४ सप्टेंबर २०२४
याप्रमाणे आयोजित केले असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिली आहे.
0 Comments