शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिसोड तालुक्याच्या वतीने मागणी.
शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिसोड तालुक्याच्या वतीने मागणी.
----------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजितसिंह ठाकूर
----------------------------
आज रिसोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे, अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकाचे अतीशय मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी तत्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, करिता रिसोड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष अरूण क्षिरसागर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आकाश पाटील शिंदे,तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव, नितीन निर्बान, गजानन माळेकर, सचिन चोपडे, सतीश पवार, प्रविण क्षिरसागर, आकाश लिंगे, शेख खुर्शीद, शेख शाईब,रतन हरकळ, गणेश सरनाईक, गणेश तमाने, प्रतीक मंत्री, नागेश वाठ, व समस्त शेतकरी मंडळी उपस्थित होती.
Comments
Post a Comment