विचारे माळ येथील प्रश्नांसाठी आप चे लाक्षणिक उपोषण.
विचारे माळ येथील प्रश्नांसाठी आप चे लाक्षणिक उपोषण.
विचारे माळ येथील कोरगावकर शाळा ते कत्तलखाना कंपाऊंड येथे क्रॉस ड्रेनचे नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. नागरिकांच्या मागणीनुसार महापालिकेने क्रॉस ड्रेनचे काम मार्च मध्ये मंजूर केले. कंत्राटदाराने पुढील शंभर दिवसात काम सुरु करणे बंधनकारक असूनही अद्याप काम सुरु झाले नव्हते. तसेच परिसरात मुतारी नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. क्रॉस ड्रेनचे काम त्वरित सुरु करावे व मुतारीचे बांधवी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शहर संघटक विजय हेगडे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
महापालिकचे कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन क्रॉस ड्रेनचे काम पुढील दोन दिवसात सुरु करणार असल्याचे सांगितले. तसेच मुतारीच्या कामाचे कोटेशन आले असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यासाठी वरिष्ठाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासानानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, प्रसाद सुतार, दुष्यंत माने, अमरसिंह दळवी, नितीन चव्हाण, राजू पवार, विजय बिराजदार, सुजल हेगडे, योगेश कांबळे, कुमार भोसले, आदेश हेगडे, गणेश लोखंडे, गणेश बिरांजे, सतीश दाभाडे, रोहन मोहिते, सतीश थोरात आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment