वडूज पोलीस स्टेशन तालुका खटाव येथील पोलिसांनी दिशाभूल करणारा खुनाचा गुन्हा अखेर उघड केलाच.
वडूज पोलीस स्टेशन तालुका खटाव येथील पोलिसांनी दिशाभूल करणारा खुनाचा गुन्हा अखेर उघड केलाच.
-------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
------------------------------------
-दि.१६/०६/२४ रोजी वडूज पोलीस ठाणे हददीत मौजे कणसेवाडी गावचे हद्दीत डोंगाराचे जवळ पिंपरनीच्या झाडाला विजय महादेव डोईफोडे रा.कणसेवाडी हा गळफास घेतल्याबाबत वडूज पोलीस ठाणेस समजले मयत असल्याने त्या ठिकाणी पोलीसांनी जावून प्रेताचा पंचनामा केला त्यावेळी मयत विजय डोईफोडे याचे डोक्यास मार व छातीवर ओरखडलेचे दिसुन आले व मानेवर गर्द व्रण दिसला असा पंचनामा करुन ग्रामीण रुगणालयात पोस्टमार्टम केले त्यानंतर मयताचे चप्पल व मोबाईल सोबत नसल्याबाबत लक्षात आल्याने त्याचा शोध घेतला असता कातरखटाव एनकूळ माळावरती मयताचे चप्पला मिळून आल्या त्या ठिकाणी टॅक्टर टायर मार्क मिळून आल्याने पो. हवा. शिवाजी खाडे व पो.कॉ. गणेश शिरकुळे यांना संशय आल्याने त्यांनी मोबाईलचे तांत्रिक माहिती वरुन तसेच डोंगर परिसरात फिरुन पाहणी केली असता मयत घडले ठिकाणापासून पश्चिमेस १ कि.मी. अंतरावरती निर्जन ठिकानी ट्रॅक्टरच्या टायरचे मार्क व मयताचा मोबाईल दिसल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावल्याने त्याबाबत वस्तीवरील लोकांकडे विचारपूस केली असता मयत विजय डोईफोडे हा मयत घडण्यापूर्वी अधिक जाधव याचेबरोबर दिवसभर असल्याने तो ज्या-ज्या ठिकाणी गेला होता तेथील सी.सी.टी.व्ही.फुटेजची पाहणी व मोबाईलच तांत्रिक माहिती वरुन पो.हवा.शिवाजी खाडे व पो.कॉ.गणेश शिरकुळे यांनी खात्री करुन घेण्यासाठी आरोपी अधिक बाबा जाधव याचे घराचे परिसरात जावून अधिक जाधव याचे ट्रॅक्टरचे मार्क हे निर्जन ठिकाणी मिळून आलेल्या टायरचे मार्कशी एकसारखे असल्याचे दिसल्याने सदर मयताबाबत नातेवाइक याना देखील घातपात केल्याचा संशय असल्याने त्यानी वडूज पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केल्याने यातील संशयीत आरोपी अधिक जाधव याचा कातर खटाव परिसरात शोध घेवून त्यास ताब्यात घेऊन तसेच विश्वासात घेवून विचारले असता त्याने जुने वादावादीचे कारणावरुन यातील मयत विजय डोईफोडे यास दारु पाजून निर्जन ठिकाणी नेहून लघवीसाठी ट्रक्टरमधून खाली उतरवून विजय हा बेसावध असताना त्याचेच गळ्यातील शालीने त्याचा गळा आवळून ठार मारुन ट्रॉलीमध्ये टाकून कणसेवाडी डोंगराचे कडेला आरोपी सुरज संपत सांळुखे याची मदत घेवून पिंपरनीच्या झाडाला त्याच शालीने लटकावून गळफासाचा देखावा केला होता.
सदरची कारवाई समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. घनश्याम सोनवणे, सपोनि अमोल माने, पो. हवा. शिवाजी खाडे, पो. कॉ. गणेश शिरकुळे व पोलीस पथक यांनी कार्यतत्परता, प्रसंगावधान दाखवून, जलद कार्यवाही केल्यामुळे खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणुन आरोपीस अटक करुन खूनाचा गुन्हा उघडकीस आणला या उत्कृष्ट कामगीरीबाबत मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचे कडुन वडुज पोलीस ठाणे पथकास रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देवुन गौरविण्यात आले आहे.
nice news
ReplyDelete